शेतकऱ्यांच्याबाबतीत सर्वच पक्ष खलनायक : बच्चू कडू

येवला : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वच राजकीय पक्ष नालायक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही म्हणून जनतेने भाजप-शिवसेनेला सत्ता दिली. परंतु हे पक्षही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहिले नाही, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घेतला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर शेतकऱ्यांना उद्देशून ‘साले’ म्हटले. त्यामुळे शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या दानवेंना येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याचा ‘विडा’ मी उचलला आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

कांदा उत्पादकांचे प्रश्न महत्वाचे आहेत, तरी शासन याबाबत उदासीन आहे. उत्पादनात राज्यात कांदा चौथ्या, पाचव्या क्रमांकावरील नगदी पीक असताना कांद्याला हमीभाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. कांद्याचे भाव वाढले तर सरकार पडण्याची भीती सरकारला असते. त्यामुळे भाव पडले तर खासदार पडू शकतो हे दाखवून द्या. शेतकऱ्यांनी जात पात विसरून एकत्र यायला हवे. तेव्हाच त्यांना गृहीत धरणे बंद होईल. जेव्हा मतदान शेतकरी प्रश्नावर होईल, तेव्हाच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. विरोधक अन सत्ताधारी एकच असून शेतकऱ्यांना झुलवत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकरी कांद्याला भाव मागत असतांना काही सत्ताधारी आमदार कांदा दर भाव कमी होण्यासाठी लक्षवेधी हे सताधारी व विरोधक मांडत आहे ही शोकांतिका आहे. कांदा खाल्ला नाही तर माणूस मरत नाही, असे काही बिनडोक म्हणतात. मग त्याचा भाव सरकार का पाडते ते सांगा, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसंच, कांद्याला किमान १८०० रुपये भाव मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेनेच्या ‘या’ कार्यकर्त्याने मागितली खंडणी
जयंत पाटील, मी चांगलं काम करतो म्हणून इतका दुस्वास करता का ?