Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाठदुखी किंवा बॅक पेन (Back Pain) हा सर्वात सामान्य शारीरिक आजारांपैकी एक आहे. भारतात पाठदुखीच्या घटनाही चिंताजनक आहेत, कारण भारतातील जवळपास 60 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी पाठदुखीचा (Back Pain) त्रास होतो. घराची साफसफाई करताना किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करताना पाठीला झटका बसला असेल.

 

तसेच संधिवात आणि अँकिलोझिंग स्पाँडिलायटिस (Arthritis And Ankylosing Spondylitis) सारख्या कोणत्याही क्रोनिक स्थितीमुळे पाठदुखी (Back Pain) असू शकते. कधीकधी ही वेदना असह्य होते. तीव्र पाठदुखीसाठी, डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काहीवेळा तुम्ही घरच्या घरी हलक्या पाठदुखीवर उपचार करू शकता (Home Remedies For Normal Back Pain).

 

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन सेंट लुईस येथील न्यूरोलॉजिकल सर्जरी विभागाचे स्पाईन सर्जरीचे प्रमुख विल्सन रे (Wilson Ray) म्हणतात, पाठदुखीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपचार उत्तम काम करतात (Best Home Remedies For Back Pain). यामध्ये तुम्ही औषधांच्या सेवनापासून वाचता आणि उपचारात जास्त पैसे खर्च होत नाहीत. तुम्हालाही पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

 

1. चालत रहा (Keep Moving)
विल्सन रे यांच्या मते, पाठदुखीचे विविध प्रकार असलेल्या रुग्णांमध्ये एक सामान्य गैरसमज असा आहे की ते सक्रियपणे चालू शकत नाहीत. परंतु तुमची क्रिया किंवा चालणे कायम ठेवल्याने पाठदुखी कमी होण्यास मदत होते. ज्याला पाठदुखीचा त्रास आहे त्याने दररोज किमान 30 मिनिटे चालावे.

अटलांटा येथील एमोरी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील ऑर्थोपेडिक्सचे सहाय्यक प्राध्यापक, MD, डॉ. सलमान हेमानी (Salman Hemani) यांच्या मते, जर कोणी सक्रिय नसेल, तर त्यांच्या मणक्याचे आणि पाठीच्या आजूबाजूचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे वेदना होतात. त्यामुळे पाठदुखी असेल तरीही चालत राहा.

 

2. स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ एक्सरसाईज (Stretching And Strength Exercises)
पोटाचे मुख्य स्नायू पाठीला आधार देण्यास मदत करतात. ताकद आणि लवचिकता दोन्ही तुमच्या वेदना कमी करण्यात आणि टाळण्यास मदत करू शकतात. त्यामुळे स्ट्रेचिंग आणि पाठ मजबूत करणारे व्यायाम विसरू नका. यासाठी, योगा, पिलेट्स आणि तायची तुमच्या कोर आणि हिप्सच्या सभोवतालचे स्नायू मजबूत करण्यास मदत करू शकतात.

 

3. योग्य पोश्चर ठेवा (keep The Right Posture)
योग्य आसन केल्याने पाठीच्या खालच्या भागावरील दाब कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला पाठदुखी असेल, तर तुमचा पाठीच्या कण्याला अलायमेंटमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही टेप, स्ट्रीप किंवा स्ट्रेची बँड वापरू शकता. तुमचे खांदे वाकवू नका किंवा हनुवटी पुढच्या बाजूला झुकवू नका. असे केल्याने पाठीच्या खालच्या भागावर अधिक भार पडतो.

 

जर तुम्ही स्क्रीनसमोर काम करत असाल, तर तुमचे हात टेबलावर किंवा डेस्कवर समतोल ठेवा आणि तुमचे डोळे स्क्रीनच्याच्या भागावर ठेवा, डोके वाकवू नका.

 

4. वजन मेंटन करा (Maintain Weight)
जर एखाद्याचे वजन जास्त असेल तर त्याच्या पाठीत दुखणे साहजिकच असते.
पाठदुखी टाळण्यासाठी, वजन कमी करा जेणेकरुन पाठीचा दाब कमी करता येईल.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही फिटनेस ट्रेनरची मदत घेऊ शकता.

5. धूम्रपान सोडा (Quit Smoking)
संशोधनात असे दिसून आले आहे की जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुम्हाला मणक्याच्या इतर समस्या होण्याची शक्यता धुम्रपान न करणार्‍या व्यक्तीपेक्षा 4 पटीने जास्त असते.
सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीन तुमच्या मणक्यातील हाडे कमकुवत करू शकते.
म्हणूनच धूम्रपान सोडणे देखील महत्त्वाचे आहे.

 

6. आईस पॅकने शकवा (Try Ice Pack)
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाने शेकवणे हा एक चांगला मार्ग असू शकतो.
जर तुमच्या पाठीला सूज किंवा वेदना होत असतील तर बर्फ जास्त आराम देतो.

जर तुम्ही ताठ किंवा घट्ट स्नायूंना आराम देण्याचा प्रयत्न करत असाल तर हीटिंग पॅड अधिक चांगले ठरू शकते.
यासाठी 20 मिनिटे आयसिंग हा उत्तम उपाय ठरू शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Back Pain | lower back pain relief home remedies backed by science ways to relieve back pain naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

 

BJP MLA Nitesh Rane | ‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, ‘ओवैसीला’ औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..’; नितेश राणेंचा कडक इशारा

 

Gold Silver Price Today | आजचे सोन्या-चांदीचे दर काय ?; जाणून घ्या