SBI च्या खातेदारांना मोठा झटका, ‘सेव्हिंग’च्या अकाऊंट्सवर ‘हा’ निर्णय झाला लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) बचत खाते असेल, तर ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी बँकेने बचत खात्यात मिळालेल्या व्याजात कपात करण्याची घोषणा केली होती. बुधवारी 15 एप्रिलपासून ही घोषणा प्रभावी झाली आहे. या घोषणेमुळे आता खातेधारकांना 0.25% कमी व्याज मिळेल. मात्र, बँकेने आपल्या एटीएम कार्डधारकांना मोठा दिलासाही दिला आहे.

बँकेने वेबसाइटवर केले जाहीर

आतापासून खातेदारांना त्यांच्या बचत खात्यात 2.75 टक्के व्याज मिळेल, असे बँकेने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. बँकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बँकांकडे पुरेशी रोकड असल्याने बचत ठेवीवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहकर्ज दरही कमी झाला

एसबीआयने सीमान्त किंमत आधारित कर्ज व्याज दरामध्ये (एमसीएलआर) 0.35% कपात करण्याची घोषणा केली आहे. याने आपल्या गृह कर्जाची ईएमआय कमी होईल. बँकेने म्हटले आहे की याद्वारे 30 वर्षांच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता प्रति 1 लाख रुपयांच्या कर्जावर 24 रुपयांनी कमी केला जाईल.

15 एप्रिलपासून एसबीआय बचत खात्याचे व्याज दर

11 मार्च रोजी एसबीआयने सर्व ग्राहकांसाठी बचत बँकेचे व्याज दर कमी करून 3 टक्के केले. पूर्वी 1 लाखापर्यंतच्या शिल्लक रकमेवर हे 3.25 टक्के होते आणि 1 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 3 टक्के होते. आता सर्व बचतींवर ते 2.75 टक्के आहे.

एटीएम कार्डधारकांना मोठा दिलासा

तथापि, बँकेने आपल्या एटीएम कार्डधारकांना मोठा दिलासा देत स्पष्ट केले की ते 30 जूनपर्यंत एटीएमवर नि:शुल्क 5 व्यवहारानंतर आकारण्यात येणाऱ्या सर्व्हिस शुल्काला 30 जूनपर्यंत हटवण्यात येणार आहे.