Bad Smell In Urine | तुमच्या लघवीला सुद्धा दुर्गंधी येते का? ‘या’ आजारांचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bad Smell In Urine | सार्वजनिक शौचालयासारख्या ठिकाणी काही वेळा इतकी तीव्र दुर्गंधी येते की, तो वास सहन करणे कठीण होते. लघवीतून दुर्गंधी येणे (Urinary Odor) हे अगदी सामान्य आहे, परंतु काहीवेळा हा दुर्गंध एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतो. कोणत्या आजारांमुळे लघवीतून दुर्गंधी (Bad Smell In Urine) येऊ शकते ते जाणून घेवूयात…

 

1. युटीआय (UTI) –
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन Urinary Tract Infection (UTI) ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा या समस्येचा सामना करावा लागतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे किडनी (Kidney), ब्लॅडर (Bladder) आणि त्याच्याशी जोडलेल्या नलिकांवरही परिणाम होऊ शकतो. वेळीच तपासणी केली नाही, तर हा संसर्ग किडनीमध्येही पसरू शकतो.

 

2. पाणी कमी पिणे (Drink Less Water) –
शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. यामुळे, जेव्हा पुरेसे पाणी प्यायले जात नाही, तेव्हा हे टाकाऊ पदार्थ सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे लघवीला खूप दुर्गंधी येते. यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक (Drink Plenty Water) आहे.

 

3. कॉफीचे अतिसेवन (Overdose Of Coffee) –
जास्त प्रमाणात कॉफी घेतल्याने लघवीला दुर्गंधी येते. कॉफीलामुळे (Coffee) डिहायड्रेशनच्या समस्येला (Dehydration Problem) सामोरे जावे लागते, ज्यामुळे लघवीला दुर्गंधी येऊ शकते.

 

4. मधुमेह (Diabetes) –
ज्यांना मधुमेह आहे हे माहित नसते त्यांच्या लघवीलाही दुर्गंधी (Bad Smell In Urine) येऊ शकते. मधुमेही रुग्णांच्या शरीरात साखर पचवता येत नसल्याने असे घडते. त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंधी येते. मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) वारंवार लघवीला जावे लागते आणि हे देखील त्याचे एक लक्षण आहे.

5. एसटीआय (STI) –
दुर्गंधीयुक्त लघवीचे एक मुख्य कारण लैंगिक संक्रमण (Sexually Infection) किंवा एसटीआय Sexually Transmitted Infections (STI) असू शकते.
कधीकधी या संसर्गामुळे मूत्रमार्गात सूज येऊ शकते ज्यामुळे लघवीचा वास बदलू शकतो.
एसटीआय व्यतिरिक्त महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्यास लघवीला दुर्गंधी येऊ शकते.

 

5. यीस्ट इन्फेक्शन (Yeast Infections) –
आपल्या त्वचेवर सामान्यतः कँडिडा (Candida) नावाची बुरशी असते.
ही बुरशी महिलांच्या प्रायव्हेट पार्टसह शरीराच्या कोणत्याही भागात आढळू शकते.
जेव्हा ही बुरशी खूप जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

 

यीस्ट इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की, ओले कपडे घालणे किंवा घाणीत राहणे इ.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना यीस्ट इन्फेक्शनच्या समस्येला जास्त सामोरे जावे लागते, ज्यामुळे लघवी करताना दुर्गंधी येते.
प्रायव्हेट पार्टमध्ये लालसरपणा, सूज आणि पांढरा स्त्राव यांसारखी याची इतर लक्षणे आहेत.

 

पुरुषांमध्येही यीस्ट इन्फेक्शनची लक्षणे आढळतात, परंतु ती महिलांइतकी गंभीर नसतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Smell In Urine | know the reason behind smelly urine can be signs of these diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Protein Rich Food | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा ‘या’ 2 गोष्टी, मिळेल संपूर्ण प्रोटीन; दुप्पट होईल शरीराची ताकद