Bail In MCOCA-Pune Crime | पुणे : मोक्का गुन्ह्यातील आरोपीला स्पेशल मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bail In MCOCA-Pune Crime | विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 सप्टेंबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करुन मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी श्याम सुभाष कांबळे याला पुणे स्पेशल मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जामीन मंजुर केला असल्याची माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली. (Bail In MCOCA-Pune Crime)

काय आहे प्रकरण?

शुभम नरसिंग आडके यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी याने त्याच्या मित्रांसोबत मिळून भेगडे आळी येथे मोरया मित्र मंडळ नावाचे गणपती मंडळ स्थापन केले होते. तळेगाव दाभाडे येथील राहणारा कुणाल ठाकूर आणि त्याच्या टोळीतील मुलांसोबत फिर्यादीचा बरेच वर्षापासून वाद होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी शुभम आडके याचा मित्र विशाल वर्मा आणि कुणाल ठाकूरच्या टोळीतील मुलांचा वाद झाला होता. त्या कारणावरून 8 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीनच्या सुमारास कुणाल ठाकूर आणि आठ ते दहा जण विशाल वर्माला मारण्याकरिता निळकंठ नगर येथे आले होते. त्यावेळी विशाल बाहेर गेला होता. फिर्यादी याने कुणाल ठाकूर यांच्या टोळीतील धीरज गरुड याला रात्री आठ वाजता फोन करून भांडण मिटवून घेण्याकरता बोलला, त्यानंतर रात्री दहा वाजता फिर्यादीला कुणाल दुबे याने फोन केला आणि फिर्यादीला ‘जास्त माजला आहे का’ असे बोलून शिवीगाळ केली आणि बघून घेतो अशी धमकी दिली. (Bail In MCOCA-Pune Crime)

9 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 1:30 च्या सुमारास फिर्यादी अक्षय गायकवाड, मंगेश लोखंडे हे मोरया मित्र मंडळात बसले होते. त्यावेळी अचानक 7 ते 8 टू व्हीलर गाड्यांवर कुणाल ठाकूर, वैभव अवचरे, कुणाल दुबे, धीरज गरुड, अथर्व शिंदे, बंटी किरवे, किरण भालेराव इतर 8 ते 10 जण हातामध्ये लांब कोयते घेऊन आले. कुणाल दुबे याने फिर्यादी शुभम आडके याला म्हणाला ‘जास्त मस्ती आली आहे तुला’ आणि सर्वांनी मिळून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी खाली पडला असता कुणाल दुबेने फिर्यादीला ओरडून म्हणाला की ‘आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे बोलून जीवे ठार मारण्याकरिता कोयत्याने फिर्यादीचे डोक्यात वार केला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र अक्षय गायकवाड याने कोयता हाताने पकडला त्यामुळे त्याची बोटे कापली गेली. कुणाल ठाकूर याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याकरिता मानेवर कोयतेने वार केला असता, हात मध्ये केल्याने फिर्यादीच्या हाताला जखमा झाल्या. नंतर सर्वांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूची लोक तिथे आल्याने सर्वजण गाड्या घेऊन पळून गेले.

वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

या गुन्ह्यातील आरोपी श्याम सुभाष कांबळे याने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत जामिनाचा अर्ज स्पेशल मोक्का न्यायालयात दाखल केला.
आरोपीचे वकील यांनी आरोपीची बाजू मांडली. आरोपीची या गुन्ह्यात भूमिका नाही तसेच इतर बाबी मांडून युक्तिवाद केला.
दरम्यान आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून स्पेशल मोक्का न्यायाधीश पी. पी. जाधव कोर्टाने
आरोपीला अटी व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत.
गुन्ह्यातील आरोपी शाम सुभाष कांबळे तर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी जामीन मिळण्यासाठी युक्तिवाद केला.
तसेच ॲड. आनंद चव्हाण, ॲड. अक्षय पवार यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Junnar Vidhan Sabha | जुन्नरची जागा कोण लढवणार? शरद पवार म्हणाले…

Total
0
Shares
Related Posts