Bal Shivaji Movie Teaser | 350 व्या शिवराज्याभिषेक दिनी रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचा टीझर आऊट; बाल शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

पोलीसनामा ऑनलाइन – Bal Shivaji Movie Teaser | आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 350 वा राज्याभिषेक दिन आहे. या निमित्ताने ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचा पहिला टीझर रिलिज करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून बाल शिवाजी या चित्रपटाच्या चर्चा रंगत होत्या. यामध्ये शिवरायांची मुख्य भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता याबाबत खुलासा झाला असून, पोस्टर पाहून मराठी प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. (Bal Shivaji Movie Teaser)

Advt.

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर (Actor Akash Thosar) हा ‘बाल शिवाजी’च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आकाशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचे पोस्टर व टीझर शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन लिहीले आहे की, “लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर”. या पोस्टरमध्ये आकाश शिवरायांच्या पेहरावात दिसत असून, त्याच्या नजरेतील आग व चेहऱ्यावरील जखमा शिवरायांच्या शौर्याची ग्वाही देत आहेत.

तसेच या चित्रपटाचा टीझर (Bal Shivaji Movie Teaser Out) देखील लॉन्च करण्यात आला आहे. ॲनिमेटेड ग्राफिक्समध्ये असणाऱ्या या टीझरमध्ये आदर्श शिंदेच्या (Adarsh Shinde) आवाजातील गाणे आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरखाली प्रेक्षकांनी चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याच्या कमेंट केल्या आहेत. आकाशच्या या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या पहिल्या लूक पाहून प्रेक्षक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. त्या पोस्टच्या खाली जय शिवराय, जगदंब, जय भवानी जय शिवाजी अशा कमेंट्स केल्या जात आहे. या सिनेमात शिवरायांचे वय वर्षे 12 ते 16 पर्यंत आयुष्यातील प्रवास, त्यांची स्वराज्य शप्पथ, बालवयात त्यांची झालेली जडणघडण आणि राजमाता जिजाऊंनी दिलेली संस्काराची शिदोरी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Director Ravi Jadhav) यांनी केले आहे. तर संदीप सिंह (Sandeep Singh), सॅम खान (Sam Khan), विशाल गुरगानी (Vishal Gurgani), जुही पारेख मेहता (Juhi Parekh Mehta), अभिषेक व्यास (Abhishek Vyas) आणि रवी जाधव हे निर्माते आहेत. . (Bal Shivaji Movie Teaser)

दिग्दर्शक रवी जाधव चित्रपटाबाबत म्हणाले आहेत की, “माझा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे आई- वडील,
जिजामाता आणि शहाजी राजे भोसले (Shahaji Raje Bhosale) यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून
दिलेले अमूल्य योगदान दाखवेल. तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्याची कौशल्ये कशी
तीक्ष्ण झाली हे दाखवेल” तसेच रवी जाधव यांनी चित्रपटाबद्दल अधिकची माहिती देताना सांगितले की,
“मी गेली नऊ वर्ष ‘बाल शिवाजी’ या सिनेमाच्या संहितेवर काम करत आहे.
दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमा करणार आहे. सिनेमाची कथा संदीप सिंह यांनी समजून घेतली.
मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली आहे.
तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे.
या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो आहे”.

आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा ‘बाल शिवाजी’ चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Web Title : Bal Shivaji Movie Teaser | Ravi Jadhav’s ‘Baal Shivaji’ Teaser Out on 350th Shiva Rajyabhishek Day; The famous actor ‘Ha’ will be seen in the role of Bal Shivarai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी

Maharashtra Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपच्या 6 व शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ