Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वांत मोठी पायी वारी म्हणजे आषाढी वारीला (Pandharpur Ashadhi Wari 2023) लवकरच सुरुवात होणार आहे. वैष्णवाच्या या मेळ्यात अनेक भाविक तल्लीन होऊन पंढरपुरच्या दिशेने चालत असतात. भक्तांचा आणि त्यांच्या पांडुरंगाचा हा अनोखा मिलाफ बघायला अनेक लोक येत असतात आणि हा सोहळा डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून घेत असतात. आता मात्र सोलापूर जिल्ह्यात आषाढी वारीच्या (Pandharpur Ashadhi Wari 2023) पार्श्वभूमीवर दि. 20 जून ते 4 जुलै पर्यंत संपूर्ण पंढरपूर येथील आषाढी वारी मार्गावर ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (No Drone camera Zone In Pandharpur Ashadhi Wari 2023)

सोलापूरमध्ये पालखी काळात अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार (Additional District Magistrate Shama Pawar) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी घेण्यात आली असून या अधिसूचनेत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात सांगण्यात आले आहे की, जिल्ह्यातील महत्वाची धार्मिक स्थळे, केंद्रीय संस्था, वरिष्ठ कार्यालयांकडून वेळोवेळी सुरक्षिततेच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला (Solapur Collector’s Office) देण्यात येत होत्या. या सूचनाचा विचार करत, गोपनीय माहितीचा गैरवापर करत दहशतवादी कारवायामध्ये (Terrorist Activity) ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असते. या सर्व वारकऱ्याच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

आषाढी वारीच्या (Pandharpur Ashadhi Wari 2023) २० जून ते दि. ४ जुलै या कालावधीत मानाच्या पालख्या
पायी चालत पंढरपूरच्या (Pandharpur Vitthal Mandir) दिशेने येणार आहेत.
येत्या २८ जून रोजी पंढरपूर येथे सर्व पालख्या एकत्र येणार आहेत.
यावेळी लाखो भाविकांचा मेळा मंदिर व मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेला असतो.
या ठिकाणी विशेषतः वेगवेगळ्या नदी घाटावर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर अनेक माध्यम,
खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण केले जाते.
याचा गैरफायदा कोणत्याही दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यासाठी होऊ नये,
याकरिता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत
लागू राहील, असेही आदेशात सांगण्यात आले आहे.

Web Title :  Pandharpur Ashadhi Wari 2023 | Ban on filming with drone camera in Ashadhi Wari 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ

Pune Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या पुण्यातील आजचे भाव

Ira Khan Wedding | अमीर खानच्या घरी सुरु आहे लग्न सराईची लगबग; फोटो सोशल मीडियावर व्हायरल