हिंदू महासभेवर बंदी घाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेवर बंदी घालावी आणि उत्तरप्रदेश सरकारने हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

उत्तरप्रदेशातील अलिगढ येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडल्या आणि शौर्य दिवस साजरा केला. या कृत्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (गुरुवारी) नरपतगीर चौक येथे आंदोलन केले.

अलिगढमधील कृत्याचा निषेधही मोदी यांनी अद्याप केला नाही याबद्दल बागवे यांनी टीका केली आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जातीयवादी शक्तींना प्रोत्साहन दिले असा आरोपही त्यांनी केला. आंदोलकांसमोर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, पक्षनेते अरविंद शिंदे आणि संगीता तिवारी यांची भाषणे झाली. आंदोलनात नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, चाँदबी नदाफ, अनिल सोंडकर, मुकारी अलगुडे आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.