ICC World Cup 2019 : क्रिस्टियानो रोनाल्डो आणि सौम्या सरकार हे ‘भाऊ-भाऊ’, जन्मताच झाले ‘वेगळे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा आता मध्यात येऊन ठेपली आहे. सर्वच संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सामने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ आणि आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.

त्याचबरोबर काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ४८ धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र ३८२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने उत्तम संघर्ष करताना ३३८ धावा केल्या. बांग्लादेशकडून कर्णधार मुशफिकीर रहीम याने शानदार शतकी खेळी केली मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी केली.

या सामन्यानंतर आयसीसीने केलेल्या ट्विटने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. आयसीसीने ट्विटमध्ये म्हटले कि, सौम्या सरकार आणि फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो हे सख्खे भाऊ आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, आयसीसीने आपल्या ट्विटमध्ये असे का म्हटले आहे. तर त्याला कारण देखील असेच मजेदार आहे. कालच्या सामन्यात सौम्या सरकार याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच याला बाद करत आपल्या कारकिर्दीतील दुसरी विकेट घेतली. त्यानंतर त्याने या विकेटचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर साजरा केला.

जल्लोष साजरा करताना त्याच्यात आयसीसीला क्रिस्टियानो रोनाल्डो याची झलक दिसली. ज्याप्रमाणे क्रिस्टियानो रोनाल्डो गोल केल्यानंतर जल्लोष करतो. त्याचप्रमाणे सौम्या सरकार याने देखील विकेट घेतल्यानंतर जल्लोष केला. त्यावरून आयसीसीने ट्विट करत त्याची फिरकी घेतली.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना काही क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीची फिरकी घेतली. तर काही चाहत्यांनी हि पोस्ट डिलीट करण्याची मागणी केली. त्यामुळे आता यावर आयसीसी काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.