बँकेची महत्वाची कामे लवकर करा पूर्ण, 3 दिवस आहे सुट्टी, चेक करा ‘लिस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचेही बँकेचे महत्वाचे काम असेल तर ते उद्याच पूर्ण करा, कारण आगामी दिवसात बँका काही दिवस बंद राहणार आहेत. शनिवारपासून केवळ एक दिवस सोडून लागोपाठ बँकांना सुट्टी आहे. अशावेळी महत्वाची कामे आणि पैशांच्या व्यवहारांना उशीर होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत की, येत्या काही दिवसात बँका केव्हा बंद असणार आहेत.

लागोपाठ बँका बंद राहणार
या वर्षी जानेवारीमध्ये अनेक सुट्या होत्या ज्यामुळे बँका कमी दिवस उघड्या राहिल्या. तर आता 23, 24 आणि 26 जानेवारीला सुद्धा बँका बंद राहतील. 23 ला चौथा शनिवार आहे, 24 ला रविवार आहे. यानंतर बँक 25 जानेवारी म्हणजे सोमवारी उघडेल आणि पुन्हा मंगळवारी 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन असल्याने बंद राहील.

जानेवारीमध्ये आहेत 14 सुट्या
या जानेवारीत बँकांना 14 दिवस सुटी आहेत. देशाच्या विविध ठिकाणी मिळून नॅशनल आणि रिजनल हॉलिडेमुळे 14 दिवस बँका बंद राहिल्या. या त्या तारखा आहेत, जेव्हा बँकांना जानेवारीत सुट्या होत्या कारण आता महिना अजून पूर्ण झालेला नाही यासाठी येणार्‍या काही दिवसात सुद्धा सुट्या असतील.

नॅशनल हॉलिडे
1 जानेवारी (शुक्रवार)
3 जानेवारी (रविवार)
9 जानेवारी ( दूसरा शनिवार)
10 जानेवारी (रविवार)
17 जानेवारी (रविवार)
23 जानेवारी (चौथा शनिवार)
24 जानेवारी (रविवार)
26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
31 जानेवारी (रविवार)

रिजनल हॉलिडे
* 2 जानेवारीला नव्या वर्षाच्या जल्लोषासाठी मिझोरामध्ये बँका बंद राहिल्या.
* 14 जानेवारीला मकर संक्रांती/पोंगल/माघ संक्रांतीला गुजरात, तमिळनाडु, सिक्किम आणि तेलंगनामध्ये बँकांना सुटी होती.
* 15 जानेवारीला तिरुवल्लुवर दिवस/माघ बिहू आणि टुसू पूजेनिमित्त तमिळनाडु आणि आसाममध्ये बँकांना सुटी होती.
* 16 जानेवारीला मिझोराममध्ये उझावर थिरुनलसाठी बँका बंद होत्या.
* 23 जानेवारीला त्रिपुरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीला बँका बंद राहतील.
* मात्र, 23 जानेवारीला चौथा शनिवारसुद असल्याने सुद्धा बँका बंद राहतील.
* 25 जानेवारीला मणिपुरमध्ये इमोइनु इरात्पा साजरा होईल, ज्यामुळे बँका बंद राहतील.