Bank Of Baroda | KYC करणे झाले सोपे; घर बसल्या व्हिडिओ कॉलद्वारे होणार केवायसी
पोलीसनामा ऑनलाइन – Bank Of Baroda | बॅंक खातेधारकांनी KYC करणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण या प्रक्रियेसाठी प्रत्येकाला बॅंकमध्ये जाणे आणि प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत तिथे थांबणे हे शक्य होत नव्हते. खातेधारकांची ही अडचण लक्षात घेत ‘बॅंक ऑफ बडोदा’ (Bank of Baroda) या बॅंकेने नागरिकांच्या सोयीसाठी KYC करण्याची नवीन पद्धत सुरु केली आहे. आता ‘बॅंक ऑफ बडोदा’ या बॅंकेतील खातेधारकांना व्हिडिओच्या माध्यमातून केवाईसी (KYC Via Video Call) करता येणार आहे. त्यासाठी त्यांना बॅंकमध्ये जाण्याची देखील गरज नाही. आता व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी केली जाणार आहे.
बॅंकेतील प्रत्येक खात्यासाठी KYC केलेली असणे बंधनकारक आहे. यामुळे अनेक खातेधारक हे बॅंकांमध्ये फेऱ्या घालत होते. पण आता त्यांना घरबसल्या ही प्रक्रिया करता येणार आहे. ‘बॅंक ऑफ बडोदा’ या बॅंकेच्या खातेधारकांना देखील ही सुविधा मिळणार आहे. पण त्यासाठी काही नियम आहे. व्हिडिओ द्वारे केवायसी (Bank Of Baroda) ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खातेधारकाचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे नागरिकत्व भारतीय असणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर ऑनलाइन व्हिडिओ केवायसी ही प्रक्रिया करण्यासाठी त्या व्य़क्तीकडे आधार कार्ड (Aadhaar Card) व पॅन कार्ड (PAN Card) असणे बंधनकारक आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑनलाइन व्हिडिओ केवायसी (Online Video KYC) ही खातेधारकांसाठी अत्यंत
उपयोगी सुविधा ठरत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना बॅंक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर जाऊन
री-केवाईसीसाठी अर्ज करावा लागेल. हा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, बँकेचे लोक व्हिडिओ कॉलिंगद्वारे
केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील. हा व्हिडिओ कॉल सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बॅंकेकडून केला जाईल.
व्हिडिओ कॉल पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकाशी संबंधित तपशील हा बँकेच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले जातील.
ग्राहकांना मेसेज करूनही याची माहिती व सूचना दिली जाईल.
बॅंक ऑफ बडोदाची ही ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केवायसी (Bank Video KYC ) करताना खातेधारकांकडे
आधार कार्ड, पॅनकार्ड, पांढरा कोरा कागद आणि निळा पेन सोबत असावे.
या आधी ही सुविधा फक्त डिजिटल सेविंग खाते (Digital Savings Account) वापरणाऱ्यासाठी होती आता मात्र
ही ट्रेडिशनल सेविंग खाते धारकांसाठी देखील ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केवायसी सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Chandrayaan-3 आणि शेवटची 17 मिनिटे, यासाठी अतिशय महत्वाचे आहे लँडिंग; जाणून घ्या पूर्ण प्रोसेस