Chandrayaan-3 आणि शेवटची 17 मिनिटे, यासाठी अतिशय महत्वाचे आहे लँडिंग; जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : Chandrayaan-3 | आज २३ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजून चार मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मात्र, याची प्रक्रिया सुमारे ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होईल. सुमारे १७ मिनिटांचा हा काळ अतिशय महत्वाचा आहे. कारण चंद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या संख्येने खड्डे आणि खडकाच्या टेकड्या आहेत (Chandrayaan-3). मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत सर्व टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे यश मिळाले आहे त्यानुसार पुढे कोणत्याही अडचणीची शक्यता खुपच कमी आहे. परंतु आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरावा लागेल (Chandrayaan-3 Landing on Moon Surface).

शेवटच्या १७ मिनिटांचा खेळ

चांद्रयान तीन आता चंद्राच्या अतिशय जवळ आहे. सायंकाळी पाच वाजून ४७ मिनिटांपासून ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत लँडिंगची प्रक्रिया चार टप्प्यात पूर्ण केली जाईल. हे १७ मिनिट महत्वाचे आहेत. सॉफ्ट लँडिंगसाठी विक्रम लँडरच्या गतीच्या नियंत्रणावर विशेष लक्ष राहील. (Chandrayaan-3)

हळुहळु गती कमी होईल
इस्त्रोकडून कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरला २५ किमीच्या उंचीवरून हळुहळु चंद्राच्या जवळ आणले जाईल. ज्या साईटवर विक्रमला लँड करायचे आहे तेथून अंतर जेव्हा ७५० किमीच्या जवळपास असेल त्यावेळी वेग सुमोर १.६८ किमी प्रति सेकंद असेल. अशाप्रकारे जसजसे अंतर कम होईल तसतसे स्पीड कमी केले जाईल. लँडिंगच्या अगदी अगोदर स्पीड ६१ मीटर असेल.

अल्टीट्यूड होल्ड टप्पा
विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो कॅप्चर करेल आणि आता जे फोटो उपलब्ध आहेत त्यांच्याशी जुळवले जातील. जेव्हा उंची ६ किमीच्या जवळपास असेल त्यावेळी स्पीड ३३६ मीटर प्रति सेकंदचा होईल आणि त्यानंतर स्पीड ५९ मीटर प्रति सेकंद केला जाईल.

१७५ सेकंदचा फेज अतिशय महत्वाचा
फाईन ब्रेकिंग फेज १७५ सेकंद चालेल. यामध्ये लँडरची पोझिशन पूर्णपणे व्हर्टिकल असेल. यालाच सर्वात अवघड टप्पा मानले जात आहे. मागील वेळी चांद्रयान २ याच फेजमध्ये अपघातग्रस्त झाले होते.

अशी असेल टचडाऊन प्रक्रिया
यानंतरच्या १३१ सेकंदमध्ये लँडर आणि चंद्रामधील अंतर अवघे १५० मीटर होईल आणि वेग ६० मीटर प्रति सेकंद होईल.
लँडरचा कॅमेरा पृष्ठभागाचे फोटो घेईल आणि जर सर्वकाही ठीक वाटले तर पुढील ७३ सेकंदमध्ये टचडाऊनची प्रक्रिया
सुरू होईल. जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर १५० मीटर पुढील पृष्ठभाग तपासून घेईल.
सर्वकाही ठीक झाल्यावर लँड करेल.

अशाप्रकारे प्रक्रिया होईल समाप्त
विक्रम लँडरच्या लँडिंगनंतर रँप उघडेल. विक्रम धुळ खाली बसण्याची वाट पाहिल आणि त्यानंतर प्रज्ञान रोव्हर लँडरच्या
पोटातून बाहेर येईल. दोघे एकमेकांचे फोटो काढतील आणि त्यानंतर हे फोटो बेंगळुरुच्या कमांड सेंटरला पाठवले जातील.
देश आणि जगाला चांद्रयान ३ च्या लँडिंगची उत्सुकता लागली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Income Tax Refund लवकर मिळवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ उपाय, अन्यथा होईल विलंब

New Passport Rules | नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे झाले सोपे! घरी बसून करता येणार अर्ज

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! सरकार ‘या’ दिवशी करणार DA वाढीची घोषणा!