Bank of Maharashtra | आजपासून ठेवींवर १.२५% जादा व्याज, या सरकारी बँकेची दिवाळीपूर्वी ग्राहकांना भेट

नवी दिल्ली : पब्लिक सेक्टरमधील बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra (BOM) ने फि‍क्‍स डि‍पॉझिट (FD) करणाऱ्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने एफडीवर व्याजदरात १.२५ टक्केपर्यंत वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) म्हटले आहे की, नवीन दर आज म्हणजे १२ ऑक्टोबरपासून लागू होतील. व्याजदरातील वाढ एफडी आणि बँकेच्या स्‍पेशल स्‍कीमवर लागू होईल. ४६ ते ९० दिवसाच्या ठेवीवर व्याजदरात १.२५ टक्के वाढ केली आहे. यामुळे व्यक्ती आणि बिझनेस सेक्‍टरला जास्त बचतीसाठी प्रोत्साहन मिळेल (FD Interest Rate).

एक वर्षाच्या ठेवीवर ६.५० टक्के व्याज
बँकेकडून एक वर्षाच्या ठेवीवर ६.५० टक्के व्याज दिले जाईल. एक वर्षापेक्षा जास्तीच्या ठेवीसाठी व्याजदर ०.२५ टक्के वाढवून ६.२५ टक्के केला आहे. बँकेने म्हटले की, सीनियर सिटीझनला एफडीवर ०.५ टक्के जास्त व्याज मिळेल. त्यांना २०० ते ४०० दिवसाच्या विशेष बचतीवर ७.५ टक्के आकर्षक व्याज दिले जाईल. आकर्षक व्याजदर शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म सेव्हिंग करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना उत्कृष्ट पर्याय देते. (Bank of Maharashtra)

बँक ऑफ बडोदा (BoB)
याशिवाय, बँक ऑफ बडोदाने एक वर्षापर्यंतच्या पाच मॅच्युरिटी कालावधीच्या एफडी दरात ५० बीपीएस वाढ केली आहे.
पब्लिक सेक्‍टरमधील ही बँक दोन वर्षांपेक्षा जास्त परंतु तीन वर्षापेक्षा कमीच्या ठेवीवर ७.२५ टक्के (आधी ७.०५ टक्के)
कमाल व्याज देत आहे. बँकेचे नवीन एफडी दर ९ ऑक्टोबरपासून लागू आहेत. बँक ऑफ बडोदाने तिरंगा प्लस – ३९९
दिवस ठेवीवर व्याजदर कमी करून ७.१५ टक्के केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Buxar Train Accident | ‘नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस’ला अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू; १०० पेक्षा जास्त जखमी, दुर्घटनेचे कारण आले समोर!