खुशखबर ! ‘गृहकर्ज’ होणार लवकरच ‘स्वस्त’, व्याजदरात ‘कपाती’चे बँकांचे संकेत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर खरेदी करणे हे सर्वांचेच स्वप्न असते, ही संधी बँक लवकरच आपल्या ग्राहकांना देणार आहे. त्यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. बँक लवकरच स्वस्त गृह कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. याचे कारण हे आहे की बँक डिपॉजिटवर देण्यात आलेल्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करणार आहे.

एसबीआयने केली डिपॉजिटच्या व्याजदरात कपात –
लोकांकडून मिळणाऱ्या जमा रक्कमेवर म्हणजेच डिपॉजिटवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात कपात करण्याची सुरुवात सर्वात आधी भारतीय स्टेट बँकेने केली. एसबीआयने व्याज दरात कमी आणि बँकेच्या रोखीत आधिकता यामुळे डिपॉजिटमध्ये देण्यात येणाऱ्या व्याजच्या दरात ५० ते ७५ बेसिस पॉइंटने कपात केली आहे. जास्त कालावधीसाठी जमा योजनेत सामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजात २० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. २ कोटी आणि त्यापेक्षा आधिक राशी जमा करण्यावर देखील आता पहिल्या मानाने कमी व्याज मिळेल. हे नवे दर १ ऑगस्टला लागू होतील.

इतर बँकां देखील करु शकतात कपात –
एसबीआयने डिपॉजिटवर देण्यात येणाऱ्या व्याजाच्या कपातीस सुरुवात केली. आता इतर बँक देखील आपल्या व्याज दरात कपात करतील. पुढील टप्प्यात पीएनबी, बँक ऑफ बडोदा देखील डिपॉजिटच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा करु शकतात.

छोट्या योजनेच्या व्याजदरात सरकारने केली कपात –
मागील महिन्यात सरकारने छोट्या बचत योजनेच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली होती, आरबीआयकडून लागोपाठ तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केल्याने सरकारने छोट्या बचत योजनेच्या व्याजदरात कपात केली होती. या छोट्या योजनेत सुकन्या समृद्धी योजना, केवीपी, पीपीएफ, फिक्स डिपॉजिट यांचा सहभाग आहे.

आरोग्यविषयक वृत्त –