Bappa Ganaraya Song Poster | ‘बाप्पा गणराया’ गाण्याच्या पोस्टरचे शारदा गजानन चरणी अनावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bappa Ganaraya Song Poster | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बाप्पा गणराया ….’ हे गणपतीचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे, या गाण्याच्या पोस्टरचे अनावरण अखिल मंडई मंडळाच्या  शारदा गजाननाच्या साक्षीने करण्यात आले. यावेळी पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते आणि अखिल मंडई मंडळ  गणपतीचे अध्यक्ष अण्णा थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.  (Bappa Ganaraya Song Poster)

‘ बाप्पा गणराया’  हे गणरायांवरील अतिशय सुरेल गाणे  अभिनेत्री हेमा जगताप – तुपे आणि ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले आहे. गणरायाचा महिमा सांगणारे हे गाणे सुप्रसिद्ध गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिले आहे  तर प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. गायक ऋषभ साठे यांनी ‘बाप्पा गणाराया’ ला स्वरसाज चढविला आहे. विज्ञान माने यांनी या गाण्याची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रशांत पांडेकर यांनी हे गाणं दिग्दर्शित केले आहे.  (Bappa Ganaraya Song Poster)

दरम्यान, सुर्योदय प्रोडक्शन प्रस्तुत या गाण्यांचे चित्रीकरण पुणे शहरातील कात्रज येथील एका वाड्यात करण्यात आले असून,’ बाप्पा गणराया’च्या चित्रीकरणाचा अनुभव अत्यंत सुंदर होता असे अभिनेत्री हेमा जगताप – तुपे यांनी सांगितले. तसेच हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून सुमित म्युझिक च्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळणार आहे, ‘ बाप्पा गणराया ‘ हे गीत गणेशभक्तांच्या पसंतीस उतरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’