Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

पुणे : Pune Crime News | गॅस एजन्सीमध्ये (Gas Agency) रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी (BJP Former Corporator Uday Joshi) व त्यांच्या मुलाने अनेकांना कोट्यवधीचा गंडा (Cheating Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत ९ जणांनी पुढे येऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे Economic Offences Wing (EoW) तक्रारी दिल्या असून त्यांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे. उदय जोशी व त्यांच्या मुलाने जवळपास १०० जणांना २५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे सांगितले जात आहे. (Pune Crime News)

उदय त्र्यंबक जोशी Uday Trimbak Joshi (वय ६५) आणि त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी Mayuresh Uday Joshi (वय ४६, रा. पानमळा) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मंगेश जगदिश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२१ ते ६ डिसेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या. त्यांच्या मुलगा मयुरेश जोशी याला गॅस एजन्सी मिळाली. त्याच्या श्रीराम गॅस एजन्सीमध्ये (Shriram Gas Agency) रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष उदय जोशी याने दाखविले. फिर्यादी यांनी ९ लाख १० हजार रुपये तसेच त्यांच्या आईचे बँक खात्यातून ५ लाख रुपये असे एकूण १४ लाख १० हजार रुपये श्रीराम गॅस एजन्सीत गुंतविले. मयुरेश जोशी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफडी सर्टिफिकेटस फिर्यादीला दिल्या. त्यावर आजपर्यंत कोणताही परतावा न देता, फिर्यादीची १४ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केली. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांना तुला तुझ्या जीवाची भिती वगैरे वाटत नाही काय अशी धमकी दिली. त्यांनी तक्रार केल्यावर पैसे आज परत करतो, उद्या परत करतो, अशी आश्वासने तो देत होता.

फिर्यादी यांच्याप्रमाणे उदय जोशी याने अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी फिर्यादी व अन्य ८ जणांनी पुढे येऊन तक्रारी दिल्या असून त्यांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. जवळपास १०० जणांची २५ कोटी रुपयांवर फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मोरे (PI More) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक