Bappi Lahiri Passes Away | ‘गोल्डमॅन’ बप्पी लाहिरी यांचे 70 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Bappi Lahiri Passes Away | ‘आय एम ए डिस्को डान्सर’ म्हणत हिंदी चित्रपटसृष्टी लोकप्रिय असलेले गोल्डमॅन ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे मुंबईत निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लहिरी आणि मुलगी गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे. बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 मध्ये पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथे झाला होता. (Bappi Lahiri Passes Away)

 

 

बप्पी लहिरी यांचे मुळ नाव आलोकेश लहिरी असे होते. त्यांनी 1973 मध्ये “नन्हा शिकारी” या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. मात्र, त्यांना खर्‍या अर्थाने यश मिळले ते 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटामुळे. त्यांच्या गायन आणि संगीतकार म्हणून कामगिरीमुळे मिथुन चक्रवर्ती हा डान्सर म्हणून लोकप्रिय झालाच आणि बप्पी लहिरीही प्रकाशझोत आले. (Bappi Lahiri Passes Away)

 

 

 

सोन्याचे दागिने घालण्याची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या गळ्यात अनेक सोन्याच्या चैन ते घालत असत.
हातात सोन्याचे कडे, हातात अंगठ्यांमुळे सर्वात प्रथम लोकांचे त्यांच्याकडे लक्ष जात असे. गोल्डमॅन म्हणून ते लोकप्रिय होते.

 

 

बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीत क्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग केले.
रॉक आणि डिस्को संगीताची त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला ओळख करुन दिली.
चलते चलते, डिस्को डान्सर, शराबी या चित्रपटामधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली.
2020 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बागी ३’ चित्रपटातील भंकस नावाचे त्यांचे गाणे शेवटचे ठरले.

 

Web Title :- Bappi Lahiri Passes Away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा