Homeक्राईम स्टोरीNandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा...

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police |  मौजमजा करण्यासाठी 5 विद्यार्थ्यांनी (Student) नंदूरबार जिल्ह्यातील (Nandurbar Crime) नवापूर तालुक्यातील (Navapur Taluka) पानबारा शासकीय माध्यमीक आश्रम शाळेतील (Panbara Government Secondary Ashram School) लॅपटॉप चोरल्याचा (Laptop Thief) प्रकार उघडकीस आला आहे.नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन 2 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 22 लॅपटॉप जप्त केले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून चोरीचा लॅपटॉप खरेदी करणाऱ्या एकाला अटक (Arrest)  केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी दिली.

 

याबाबत माहिती अशी की, 12 फेब्रुवारी रोजी पानबारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील संगणक कक्षातील 22 लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत प्रकाश परशराम वसावे Prakash Parasharam Vasave (वय-57 रा. कोळदा, ता. नवापुर) यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात (Visarwadi police station) फिर्याद दिली. चोरट्यांनी संगणक कक्षाच्या (Computer Room) खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीचे खिळे काढून आत प्रवेश करुन 2 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 22 लॅपटॉप चोरुन नेले. हा प्रकार रात्री साडेबारा ते पहाटे पाच या दरम्यान घडला. आश्रमशाळेत चोरी झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली. (Nandurbar Police)

 

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यास सुरुवात केली. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील (API Nitin Patil) यांना माहिती मिळाली की, सोनखांब येथील 10 वीच्या एका विद्यार्थ्याकडे लेनोवो (Lenovo)  कंपनीचा लॅपटॉप आहे. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सोनखांब येथून मुलाला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने 4 मित्रांच्या मदतीने आश्रमशाळेतील लॅपटॉप चोरल्याची कबुली देऊन 21 लॅपटॉप पोलिसांना दिले. तसेच त्यातील एक लॅपटॉप धवल किरीटभाई प्रजापत (Dhawal Kiritbhai Prajapat) याला 8 हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रजापत याला अटक करुन गुन्ह्यातील लॅपटॉप जप्त केला.

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी चोरी केल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना भविष्यात अशा प्रकारचे कृत्य न करण्याबाबत त्यांनी समज दिली.
तसेच चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पाटील यांनी दिला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar),
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub-Divisional Police Officer Sachin Hiray)
यांच्या मार्गदर्शनाखाली विरसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,
पोलीस उप निरीक्षक भुषण बैसाणे (PSI Bhushan Baisane), पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी,
चालक पोलीस नाईक राजु कोकणी, अनिल राठोड, विपुल नाईक, पिंटु पावरा, अतुल पानपाटील, विशाल गावित यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Nandurbar Police | Case of theft of laptops in Panbara ashram shala in Nandurbar district solved in 48 hours; Nandurbar Police recover 22 laptops

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Solapur Crime | मंगळवेढा येथील बहुचर्चीत दोन दरोड्याचा उलघडा, दरोडेखोरांची टोळी गजाआड; पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून अटक

 

Pune Crime | प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांकडून अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News