अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि पॉर्न स्टार सारा संदर्भात धक्कादायक माहिती समोर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना ट्विटरवर अनेक लोक फॉलो करतात. खुद्द ओबामा देखील काही लोकांना फॉलो करतात. परंतु हैराण करणारी बाब अशी की, ज्या व्यक्तीला ओबामा फॉलो करतात त्यात एका पॉर्न स्टारचाही समावेश आहे. सारा जय (Sara Jay) असं तिचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/B9xIC1Nj883/

42 वर्षीय पॉर्न स्टार सारा जयचे ट्विटरवर 1.1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. यात एक बराक ओबामा आहेत. साराची स्वत:ची एक पॉर्न प्रॉडक्शन कंपनी देखील आहे. ट्विटरवर जेव्हा तिच्या प्रसिद्ध चाहत्यांची यादी जेव्हा समोर आली तेव्हा सारा ट्रेंड करताना दिसली. यातच एक नाव समोर आलं ते म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा जे तिला फॉलो करतात. यानंतर सोशलवर मात्र चर्चेला उधाण येताना दिसलं. नेटकऱ्यांच्या कमेंट यायला सुरुवात झाली.

https://www.instagram.com/p/B9sDMU9jlZI/

एकानं म्हटलं की, माजी राष्ट्रपती ओबामा पॉर्न स्टार साराला फॉलो का करत आहेत. ? आणखी एकजण म्हणतो, आज जगासाठी सर्वात महत्त्वाचं हे झालं आहे की बराक ओबामा सारा जयला फॉलो का करत आहेत. काहींनी तर असा अंदाज लावला आहे की, त्यांना साराला ऑनस्क्रीन पाहणं आवडत असावं म्हणून ते साराला फॉलो करत आहेत.

https://www.instagram.com/p/B9Pp_eNjDgZ/

या सगळ्यावर बोलताना सारा म्हणते, “कदाचित ते मला यासाठी फॉलो करत असतील कारण मी माझ्या प्रॉडक्शन कंपनीसाठी प्रौढ प्रतिभा समोर आणते. दिग्दर्शन, लेखन आणि व्यवस्थापन सगळं काही मीच करते.” असं तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/B9AYJnsDjqA/

या प्रकरणानंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी त्यांना साराला अनफॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तर ओबामा यांची पत्नी मिशेल त्यांचा फोन हिसकावत असेल असाही अंदाज लावत आहेत.

https://www.instagram.com/p/B9CfdqODNWG/

https://www.instagram.com/p/B84SFW5DwtR/

https://www.instagram.com/p/B8CjmVAjwhh/

https://www.instagram.com/p/B7jtqZ1jluH/

https://www.instagram.com/p/B6PAxNnDw3i/