Baramati Lok Sabha | इंदापूरमध्ये शरद पवारांची ताकद वाढणार, अप्पासाहेब जगदाळेंसह हर्षवर्धन पाटलांचे दोन उपाध्यक्ष पक्षात प्रवेश करणार

इंदापूर : Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. शरद पवारांचे बेरजेच्या राजकारणाचे समीकरण येथे यशस्वी होताना दिसत आहे. आता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Indapur Krushi Utpanna bazar Samiti) वर्चस्व असणारे जिल्हा बँकेचे संचालक (PDCC Bank) आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) शरद पवारांना (Sharad Pawar) साथ देणार असल्याचे समजते.(Baramati Lok Sabha)

तसेच इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कर्मयोगी साखर कारखान्याचे (Karmayogi Sugar Factory) उपाध्यक्ष भरत शहा आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे (Nira Bhima Sugar Factory) उपाध्यक्ष कांतीलाल झगडे हे दोघे शरद पवारांच्या पक्षात जाणार आहेत. मंगळवारी इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. (Indapur News)

यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची ताकद इंदापूरमध्ये वाढणार आहे. याचा लाभ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना होईल.

आप्पासाहेब जगदाळे यांचे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व आहे. तर कमयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचे इंदापूर शहारत वर्चस्व आहे. तर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांचीही या भागात मोठी ताकद आहे.

कर्मयोगी व नीरा भीमा हे दोन सहकारी साखर कारखाने भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत.
दोन्ही कारखान्याचे उपाध्यक्ष करणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याने शरद पवारांची
इंदापुरात ताकद वाढणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट