Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी आज नागपूर (Nagpur) येथे भाजप नेते (BJP Leader) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये (Pune Lok Sabha) सात वर्षांपूर्वी काँग्रेस मध्ये आलेल्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बागुल यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या बागुल यांनी यापूर्वीही फडणवीस यांची भेट घेतली होती, तेंव्हापासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर होते, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.(Aba Bagul Meets Devendra Fadnavis)

शिवदर्शन (Shivdarshan) परिसरातून सलग सहा वेळा महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांनी महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, गटनेता अशी पदे भूषविली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शिवदर्शन परिसरात त्यांनी प्रकल्प ही राबविले आहेत. परंतु नगरसेवक म्हणून काम करत असताना पक्ष संघटनेतील पदाच्या जबाबदारी पासून ते कायमच दूर राहिले. यापूर्वी त्यांनी पर्वती मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु आघाडी मध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस कडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. पर्वती मतदारसंघात सलग तीन टर्म भाजप आमदार आहेत. याठिकाणी भाजपची ताकद ही भरपूर असून इच्छुक ही आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या आबा बागुल यांना विधानसभेसाठी (Parvti Vidhan Sabha) संधी मिळणे दुरापस्त आहे.

बागुल यांचे चिरंजीव अमित बागुल (Amit Bagul) हे मागील निवडणुकीत लगतच्या प्रभागातून निवडणूक लढले होते.
मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
तर दुसरे चिरंजीव तळजाई ,सहकारनगर प्रभागातून भाजप कडून निवडणूक लढवण्यासाठी मागील दोन वर्षांपासून तयारी करत आहेत. यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी फडणवीस यांची भेट घेतली होती.
यानंतर त्यांच्या जाहिरातीतून काँग्रेस चे नाव देखील गायब झाले होते.
नेमके महापालिका निवडणुका न्यायालयीन प्रकरणामुळे पुढे ढकलल्या गेल्याने त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नव्हती.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्या नंतर पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar),
मोहन जोशी (Mohan Joshi), अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावाचीच चर्चा होती.
त्यापैकी धंगेकर यांचे नाव पक्षाने अंतिम केले. यानंतर बागुल यांनी धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेस भवन समोर आंदोलन केले.
परंतु काँग्रेस कडून याची साधी दखलही घेण्यात आली नाही.
यामुळे मुलांच्या पुढील राजकीय पुनर्वसनासाठी बागुल यांनी लोकसभा निवडणुकीची संधी साधून भाजप मध्ये प्रवेशाची तयारी केल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत साडे 17 लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | पुण्यात काँग्रेसला नाराजीचा मोठा फटका, आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

Jayant Patil | फडणवीसांनी भेटीला बोलावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाले – ‘विजयदादांना पक्षात घेतलं चांगले केलं, राजकीय वर्तुळात चर्चा’