Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | देशातील मुरब्बी राजकीय नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या पक्षाची ताकद उभी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. कालपरवा बारामतीच्या काकडे (Kakade Family), तावरे (Chandrarao Taware) कुटुंबियांची भेट घेत पवारांनी वेगळी राजकीय समीकरणे मांडत असल्याचे दाखवून दिले होते.

नंतर त्यांनी अकलूजमध्ये (Akluj) राजकीय हालचाली करून धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyashil Mohite Patil) आपल्या पक्षात घेतले. आता शरद पवारांनी अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांना सोबत घेतले आहे.

येत्या काही दिवसात अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर हे लवकरच तुतारी हाती धरणार असल्याचे समजते. तसेच भूषणसिंह होळकर हे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असणार आहेत. त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागू शकते.(Sharad Pawar-Bhushan Singh Holkar)

तीन वर्षांपूर्वी भूषणसिंह होळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.
जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वादही चर्चेत आला होता.
शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच्या लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता.
तेव्हा भूषणसिंह यांनी शरद पवारांवर आरोप करताना म्हटले होते की, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा आहे.

आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
मात्र, कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांनाही आपल्याकडे वळवण्यात वाकबगार असलेल्या शरद पवारांनी होळकरांना
सुद्धा आपल्याकडे खेचून आणले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत साडे 17 लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | पुण्यात काँग्रेसला नाराजीचा मोठा फटका, आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

Jayant Patil | फडणवीसांनी भेटीला बोलावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाले – ‘विजयदादांना पक्षात घेतलं चांगले केलं, राजकीय वर्तुळात चर्चा’