Baramati Lok Sabha Election 2024 | सोशल मीडियावर अजित पवारांवरील टीकेने समर्थक बेजार, युगेंद्र पवारांना घातला घेराव

बारामती : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंबं ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बाजूने प्रचारात उतरले आहे. यासंदर्भातील अजित पवारांविरोधातील (Ajit Pawar) व्हिडिओ, मजकुर सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांच्या भाषणाचा व्हिडिओ तर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून बेजार झालेल्या समर्थकांनी आज युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना घेराव घालत हे सर्व थांबवण्याची विनंती केली.(Baramati Lok Sabha Election 2024)

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे असून श्रीनिवास पवारांचे पूत्र आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज युगेंद्र पवारांना घेराव घातला. अजितदादांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांना आवर घाला अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असे आश्वासन दिले. सोशल मीडियात श्रीनिवास पवारांचे भाषण सध्या व्हायरल होत असून त्यामुळे अजितदादा समर्थक हवालदिल झाले आहेत.

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान काटेवाडीत गावकऱ्यांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांसाठी अडचणीचा ठरत आहे.

श्रीनिवास पवार म्हणाले होते…

श्रीनिवास पवार म्हणाले होते की, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मी अजितदादांच्या विरोधात कसा बोलत आहे.
मी नेहमी दादांसोबत राहिलो. चांगल्या काळात, वाईट काळात पण मी त्याची साथ दिली.
तो म्हणेल तशी आणि तिथे मी उडी मारली.

त्याने जे जे निर्णय घेतले त्याला साथ दिली. कधी मी त्याला विचारले नाही की असे का? पण जेव्हा आमची चर्चा झाली.
तेव्हा मी त्याला म्हटले आमदारकी तुझ्याकडे आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे.
साहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. ते गावकरी म्हणून तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत.

साहेबांचे वय आता ८३ झाले, त्यांना सोडणे मला पटले नाही. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही.
का तर आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही,
असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे, असे श्रीनिवास पवार म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Saurabh Rao | सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्त पदी नियुक्ती

Pune News | ईस्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंट क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा – सीआयआयच्या अध्यक्षांचे मत