Baramati Lok Sabha | अजितदादांच्या महायुतीत जाण्याने स्थानिक राजकारण बदललंय, आता शरद पवारांच्या काकडे-तावरे भेटीने नवी समीकरणे ?

बारामती : Baramati Lok Sabha | बारामतीच्या राजकारणात दोन महत्वाची घराणी काकडे आणि तावरे यांच्या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मागील दोन दिवसात गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी काकडे (Kakade Family) कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर त्यांनी एकेकाळचे जुने व विश्वासू सहकारी चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) यांचीही भेट घेतली. या भेटीने बारामती तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Baramati Lok Sabha)

माजी खासदार के. संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावतीताई यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकडे कुटुंबियांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर निंबुत येथे शुक्रवारी शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते श्यामकाका काकडे, सतीश काकडे यांची सांत्वनपर भेट घेतली.

अजित पवार हे राष्ट्रीत फुट पाडून आपल्या गटासह भाजपासोबत महायुतीत गेल्याने स्थानिक पातळीवर अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. सध्या काकडे परिवारातील सतीश काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. मात्र, सोमेश्वर कारखान्याबाबत त्यांनी सभासद हितासाठी लढा कायम ठेवला आहे.

दरम्यान, सांगवी परिसरात शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांचीही भेट घेतली. एकेकाळी हे दोघे मित्र बारामतीच्या राजकारणात एकत्र होते. अजित पवार यांच्या राजकारणामुळे ते एकमेकांपासून दुरावले. त्यात शरद पवार यांनी मध्यस्थीचाही प्रयत्न केला होता. परंतु तरीही मनोमिलन झाले नाही.

चंद्रराव तावरे, रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या जोडगोळीने अजित पवार यांच्याविरोधात माळेगाव कारखान्याबाबत
विरोधी भूमिका घेतली. सोमेश्वरची गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याच्या विषयात प्रतिष्ठा पणाला लावत हा डाव
हाणून पाडला होता. चंद्रराव व रंजन तावरे हे भाजपमध्ये सक्रिय आहेत.

अजित पवार महायुतीत गेल्याने आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष, म्हणजे भाजपामध्ये असूनही तावरे
हे महायुतीच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. या राजकीय गुंतागुंतीत तावरे कोणती भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.

माळेगाव कारखान्यावर (Malegaon Sugar Factory) सध्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) वर्चस्व
असून भविष्यात कारखाना ताब्यात घ्यायचा झाल्यास चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांना शरद पवारांची गरज भासू शकते.
त्यामुळे शरद पवारांच्या भेटीमुळे भविष्यात नवी राजकीय समीकरणे पुढे येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)