J-K :बारामुलामध्ये एन्काऊंटर, जैशच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियार मध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी मोठी कामगिरी घडून आणली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश मिळाले आहे. मारला गेलेला दहशतवादी जैशचा टॉप कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. लुकनाम असे मारल्या गेलेल्या कमांडरचे नाव होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कमांडर दक्षिण काश्मीरमधून उत्तर काश्मीरमध्ये निघाला होता. पाकिस्तानमधून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी तो निघाला होता. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत हा कमांडर मारला गेला.

बारामुल्लामधील बोनियारच्या बुजथलन भागात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेली चकमक अजूनही सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यात सुरक्षा दलाला दहशतवादी कमांडरला ठार करण्यात यश आले असून अजूनही कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, शुक्रवारी देखील अशाच प्रकारची एक शोधमोहीम राबवण्यात आली होती. किश्तवाड मधील एका जंगलात हि शोधमोहीम राबवण्यात आली होती. किश्तवाड पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यांनी संयुक्तपणे हि कारवाई केली होती.

आरोग्य विषयक वृत्त – 

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like