’मला माझ्या लुटमार करणार्‍या बायकोपासून वाचवा’ लग्नाच्या एक महिन्यानंतर पोलीस ठाण्यात पोहचला पती, पोलिसांना केली ‘ही’ विनंती

बरेली : वृत्त संस्था – एक विचित्र प्रकरण उत्तर प्रदेशच्या बरेली (bareilly) जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. बारादरी पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीने पत्नीला लुटमार करणारी म्हटले. इतकेच नव्हे, त्याने आपल्या पत्नीवर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्या व्यक्तीने म्हटले, तीने त्याच्या अगोदर आणखी चार लोकांशी विवाह केलेला आहे. तो तिचा पाचवा पती आहे आणि आता ती त्याला धमकावून 5 लाख रुपयांची खंडणी मागत आहे. bareilly

काय आहे पूर्ण प्रकरण
बरेली जिल्ह्यातील जोगी नवादा येथील हे प्रकरण आहे.
येथे राहणारा पीडित अंकित शनिवारी एसएसपी ऑफिसमध्ये आपली तक्रार घेऊन आला.
पीडितने पोलीस अधिकार्‍यांला तक्रार अर्ज देऊन पत्नीपासून वाचवण्याची विनंती केली.
आता तपासासाठी हे प्रकरण बारादरी पोलीस ठाण्यात गेले आहे.

पती अंकितने सांगितले की, त्याची पत्नी आपल्या कुटुंबाच्या मदतीने फसवणुक करणारी टोळी चालवते. तिचे काम आहे लोकांशी लग्न करणे आणि खंडणी घेणे. त्याने पोलिसांना सांगितले की, पत्नीने पहिला विवाह शाहजहांपुरमध्ये लखीमपुरमध्ये आणि इतर दोन विवाह दुसर्‍या जिल्ह्यात केले होते. पाचवा विवाह त्याच्याशी 9 मेरोजी केला.

पाच लाख न दिल्यास अडकवण्याची धमकी
अंकितचे म्हणणे आहे की, त्याची पत्नी आणि तिच्या घरचे त्याच्याकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागत आहेत. त्याने देण्यास नकार दिला असता त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची सर्वजण धमकी देऊ लागले. पत्नी म्हणते पाच लाख दे तरच सुटका होईल. तसेच तिने आणि तिच्या घरच्यांनी मारहाण केल्याचेही त्याने म्हटले आहे.

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

इतरांसाठी असा आहे सोमवार