अडीच महिन्यांची त्यांची ‘झुंज’ अखेर थांबली

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील निरा येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल रोजी झालेल्या वायु गळतीतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालक गेली अडीच महिने मृत्युशी झुंज देत होता. पण, त्यांची ही झुंज शनिवारी थांबली.

दत्तात्रय गायकवाड (वय ४५, रा. घनसोली, जि़. ठाणे) असे या चालकाचे नाव आहे. नीरा निंबुत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल रोजी अ‍ॅसीटिक अनहायड्राईड या विषारी रसायनाची टाकीतून वायू गळती झाली होती. कामगारांसह ५२ जण जखमी झाले होते.

चालक दत्तात्रय गायकवाड हे केमिकल भरण्यासाठी टँकर घेऊन गेला होता. त्याच वेळी हा अपघात झाल्याने त्यांना स्वत:ला वाचवण्यासाठी पळता आले नाही. ते टँकर मध्येच बेशुद्ध पडले.
त्यांना पुणे येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची अडीच महिन्याची मृत्यूशी झुंज आज अयशस्वी ठरली. या अपघातात विषारी वायू फुप्फुसात गेल्यामुळे त्यांचे फुफुस निकामी झाले होते. त्यांचे फुप्फुस बदलण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र डॉक्टरांनी त्यास नकार देत ते रुग्णाची परिस्थिती पाहता शक्य नसल्याचे म्हटले होते. शेवटी त्यांची झुंज संपली.

ज्युबिलंटच्या अ‍ॅसिटिक अनहायड्राईड प्लांटमधून विषारी वायुगळती झाल्यानंतर दोन बळी गेले आहेत. आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी तो प्लांट बंद करण्याचा ठराव केला आहे. पंरतु आजही ज्युबिलंटचा हा प्लांट सुरुच आहे. गायकवाड यांच्या मृत्युस जबादार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी नीरा नदी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय