मित्राच्या मोबाईलवर ‘I Quit’ पाठवलं, नंतर 11 व्या मजल्यावरून मारली BCA च्या विद्यार्थ्यानं उडी

राजकोट : वृत्तसंस्था – गुजरातच्या राजकोटमधील मुंजका येथे एका बीसीएच्या विद्यार्थ्याने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आपला मृत्यू होण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राच्या मोबाइलवर ‘आय क्विट’ चा मेसेज पाठविला. हे कळताच महाविद्यालयात खळबळ उडाली. त्याच्या मित्राने मोबाईलवर त्या विद्यार्थ्याचा मेसेज वाचताच तो फ्लॅटच्या दिशेने पळाला, तेव्हा त्याने पाहिले की विद्यार्थी गॅलरीत पडला होता. घटनास्थळी जमाव जमला. लोकांनी गंभीर जखमी अवस्थेत विद्यार्थ्याला क्रिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याची ओळख आरुष जगदीशन अशी आहे. तो केरळचा रहिवासी होता. गेल्या 2 वर्षांपासून येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. त्याचे वडील मुंद्रा येथे नोकरी करतात. आरुष केरळियन मिथुनभाई शिबू यांच्या घरी मुंजाकातील श्रीसिटी अपार्टमेंटमध्ये राहात असताना जेवण करण्यासाठी जायचा. मात्र त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पोलिस तपास करत आहेत.

फ्लॅटच्या आत जाण्याऐवजी त्याने मित्राच्या मोबाइलवर ‘आय क्विट’ चा संदेश पाठवत गॅलरीतून उडी मारली. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिस आरूषच्या मित्रांकडे चौकशी करत आहेत.