ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) म्हणजेच ICCने 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. या 8 स्पर्धांपैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे. भारतामध्ये 2026 साली टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup), 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि 2031 साली वन-डे वर्ल्ड कप (One-Day World Cup) होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांमुळे बीसीसीआयला (BCCI) मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचे (BCCI) 1500 कोटी रुपये वाचणार आहेत.

 

यापूर्वी 2016 साली झालेला टी20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपच्या आयोजनात बीसीसीआयचं (BCCI) 750 कोटींचं नुकसान होणार आहे. भारत सोडून अन्य देशांमधील क्रिकेट बोर्डाला सरकारनं करामध्ये सवलत दिली आहे. बीसीसीआयला ही सवलत नसल्यानं त्यांचं नुकसान होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये न होता यूएईमध्ये (UAE ) झाला तो जर भारतात झाला असता तर बीसीसीआयचे अजून नुकसान झाले असते.

बीसीसीआयला आयपीएल (IPL) स्पर्धेतून होणारी अब्जावधी रूपयांची कमाई आता करमुक्त असणार आहे. या प्रकरणात झालेल्या कायदेशीर लढाईत बीसीसीआयचा विजय झाला आहे. देशात खेळाचा विशेषत: क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आहे, त्यामुळे यावर कोणताही टॅक्स लावू नये असा बीसीसीआयकडून युक्तीवाद करण्यात आला होता. त्यांचा हा युक्तीवाद इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनल (Income Tax Appellate Tribunal) यांनी मान्य केला आहे. बीसीसीआयला आयपीएलमधून कमाई होत असली तरी त्यांचा हेतू हा क्रिकेटचा प्रसार करणे आहे, त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारी कमाई करमुक्त असेल, असा निर्णय इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनलने दिला आहे.

 

Web Title :- BCCI | bcci to save rs 1500 crore in taxes for 3 icc events in 2024 31 cycle

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतील 7000 पेक्षा जास्त गावांना दिली जाणार 4G मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी

WhatsApp Desktop App | आले WhatsApp चे नवीन अ‍ॅप, विना फोन डेस्कटॉपवर वापरा WhatsApp, जाणून घ्या कसे?

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !

Shalu Chourasiya | बागेत फिरणार्‍या अभिनेत्रीवर ‘हल्ला’, चेहर्‍यावर ठोसे मारून केले असे ‘हाल’