BCCIमध्ये प्रशिक्षकासह विविध पदांसाठी ‘भर्ती’, मागविले अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत बाहेर पडला. त्यावर बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने हेड कोच, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, फील्डिंग कोच, फिजियोथेरेपिस्ट, स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोच और एडमिनिस्ट्रेटिव मैनेजर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्या रवी शास्त्री हे भारतीय संघाचे हेड कोच आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षकपदावर गदा येण्याची शक्यता आहे.

मात्र रवी शास्त्री यांनी पुन्हा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद हवे असेल तर त्यांना पुन्हा या जागेसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे विश्वचषकाचे विजेते पद हातातून घालवल्यानंतरही रवी शास्त्री यांनी पुन्हा प्रशिक्षक पदाची धुरा त्यांना मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजीचे कोच भरत अरुण, फलंदालीचे कोच संजय बांगड़ आणि फील्डिंग कोच आर श्रीधर शामिल हे आहेत. तर हेही पुन्हा या जागांसाठी अर्ज करू शकतात.

भारतीय संघाचे प्रशिक्षक शंकर बसु आणि फीजियो पॅट्रिक फरहार्ट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर नवीन ट्रेनर आणि फीजियो यांची नियुक्ती होईल.

दरम्यान, भारतीय संघ ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून दक्षिण अफ्रीका च्याविरोधात खेळणार आहे. त्यामुळे त्याआधी नव्या प्रशिक्षकांची आणि सहयोगी स्टाफची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या