कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्‍तीबाबत BCCI चं मोठं वक्‍तव्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली आहे. येत्या काही दिवसांत धोनी निवृत्ती जाहीर करेल असे बोलले जात आहे. यापूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने धोनी या स्पर्धेनेनंतर निवृत्ती घेईल. मात्र याबाबत धोनीकडून कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही.  धोनीच्या निवृत्तीवर बीसीसीआयच्या दोन महत्वाच्या व्यक्तींनी भाष्य केले आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना आणि प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना इडुल्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या वर्ल्डकपमधील कामगिरीचे कौतुक केलं पण सेमीफायनलच्या पराभवाला निराशाजनक म्हटलं आहे.

डायना इडुल्जी यांनी बोलताना म्हटले की, भारताने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. यासाठी भारतीय संघाचे अभिनंदन आणि कौतुक. धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना त्या म्हणाल्या कि, निवृत्ती कधी घ्यावी हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. याबद्दल तो आणि त्याचं शरीर सांगू शकतं. मला वाटतं की त्याच्यात अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. तसेच धोनीच्या मार्गदर्शनाची युवा खेळाडूंना गरज आहे. तर बीसीसीआयचे सचिव सीके खन्‍ना यांनी यावर बोलताना म्हटले कि, सामना उत्तम झाला. आपल्या खेळाडूंनी उत्तम खेळ केला. मला विश्वास आहे कि, खेळाडू पुन्हा नव्या दमाने आणि मेहनत करून मैदानात उतरतील. त्याचबरोबर त्यांनी न्यूझीलंडचे अभिनंदन केले.

दरम्यान, भारतीय संघ या वर्ल्डकप स्पर्धेनंतर वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात धोनी खेळतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.