मुंबई ग्लोबल नॅशनल लेवल ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धेसाठी बीडच्या अरबाज खान ची निवड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्तरावरील मिस्टर-मिस-मिसेस मुंबई ग्लोबल नॅशनल लेवल ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धा 2019  सीजन-2 साठी बीडच्या अरबाज खान ची निवड झाली आहे. देशभरातुन अडीचशेवर जनांनी यात सहभाग नोंदविला होता. जुन 2019  मध्ये होणाऱ्या टॉप थ्री विनर्स स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या निवडी बद्दल युवा मॉडेल अरबाज खान चे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.

मुंबई ग्लोबल ही संस्था राष्ट्रीयस्तरावर ग्लोबल नॅशनल लेवल स्पर्धा आयोजित करीत असुन युवक व युवतींना मॉडलिंग व अभिनय क्षेत्रात करीयर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहैं. या संस्थेने नुकतीच इच्छुक युवक-युवतींची आॅनलाइन सौंदर्य, अभिनय, संभाषण कौशल्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर जवळपास अडीचशे व महाराष्ट्र राज्यातुन अनेकांनी आपले नशीब आजमावले. यात बीड शहरातील रहिवाशी असलेल्या अरबाज खान मुसा खान पठाण (वय 18) हा महाराष्ट्रातून निवड होणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. आगामी जुन 2019 मध्ये मुंबई येथे संपन्न होणाऱ्या मिस्टर-मिस-मिसेस मुंबई ग्लोबल नॅशनल लेवन ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धा 2019  सीजन-2 साठी निवड झाली आहे. ही निवड मुंबई ग्लोबल चे चीफ एडीटर राजकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय निवड समिती ने केली आहे.

अरबाजला बालपनापासुन अभिनय व मॉडलिंगची आवड 

अरबाज खान ला बालपनापासुन अभिनय व मॉडलिंगची आवड आहे. सध्या तो शहरातील मिल्लीया महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षात शिकत आहे. अरबाजखान हा सामाजिक कार्यकर्ते मुसाखान पठाण यांचा मुलगा आहे. सामान्य परीवारात जन्मलेला अरबाज जिद्द, चिकाटी व आपल्या कर्तव्याच्या बळावर आपले स्वप्न साकारण्याचे स्वप्न पाहत आहे.

..आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले !

अभिनय व मॉडलिंग सोबतच अरबाज खान ला शिक्षणात देखील मेरीट चा विद्यार्थी आहे. डॉक्टर बनुन समाजसेवा करावयाची त्याची ईच्छा आहे. याच वर्षी तो शहरातील एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न केले मात्र पैशाअभावी त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले. तरीही त्याने वेळ वाया न घालता  शहरातील मिल्लीया महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाला अ‍ॅडमिशन घेउन आपले शिक्षण सुरूच ठेवले.

टॉप थ्री विनर्स झाल्यावर अरबाज चे सितारे जगमगणार! 

टॉप थ्री विनर्स स्पर्धेत विजेता ठरल्यावर अरबाज खानच्या जीवनात नशीबाची कवाडे उघडी होणार आहे. शॉर्ट फिल्म, तरूणाईला वेड लावणा-या वेब सीरीज, टिव्ही सिरीयल, व्हिडीओ अलबम, मॉडलिंग,बड्या-बड्या कंपनीच्या जाहिरातीसह फिल्म इंडस्ट्रीज मध्ये नशीब आजमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 मुंबई ग्लोबल देणार प्रशिक्षण

मुंबई ग्लोबल नॅशनल लेवल ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धा 2019  सीजन-2 साठी निवड झालेल्या अरबाज खान ला राष्ट्रीय पातळीवर होणाºया टॉप थ्री विनर्स स्पर्धेपूर्वी मुंबई ग्लोबल संस्था अभिनय व मॉडलिंग, रँपवॉक, स्टेट कव्हरेज, इंग्रजी सभाषण आदि बाबत चे 30 दिवसांचे   प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान अरबाज ला संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकड्न भरपुर कांही शिकायला भेटणार आहे. ही अरबाज साठी एक सुवर्ण संधी आहे.