केसगळती, कोंडा दूर करून केसाचं सौंदर्य वाढवायचंय ? ‘असा’ करा लसणाच्या तेलाचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – लसूण एक पदार्थ आहे जो सहज उपलब्ध होतो. यामुळं केसांना असणारी सर्व पोषकतत्वं मिळतात. लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्ल्ड सर्क्युलेशनला वाढवण्याचं काम करतं. याशिवाय लसणाच्या तेलात असणारं सल्फर केसांसाठी खूप फायदेशीर असतं. यानं केस गळतीची समस्या दूर होते आणि केस मजबूत होतात. आज आपण याचे काही घरगुती मास्क आणि फायदे पाहणार आहोत.

इरिटेटेज स्कॅल्प शांत करायचे असतील तर यासाठी लसणाच्या तेलाचा खूप फायदा होतो. यामुळं केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. तुम्ही इतर तेलातही लसणाचं तेल एकत्र करून वापरू शकता. तसंच याचा वापर करून तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता.

कसा कराल लसणाच्या तेलाचा वापर ?

1) लसणाचं तेल आणि खोबरेल तेल –

गरजेनुसार लसणाचं तेल घ्या
यात प्रमाणानुसार खोबरेल तेल एकत्र करा.
तयार मिश्रण केसांच्या मुळांना हलक्या हातांनी लावा.
हलक्या हातानं केसांची मसाज करा.
अर्ध्या तासानं शॅम्पूनं केस धुवून टाका.

2) लसणाचं तेल आणि मध – तुम्ही मध आणि लसणाच्या तेलाचाही हेअर मास्क तयार करू शकता. यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

गरजेनुसार मध घ्या
यात मधाच्या प्रमाणानुसार लसणाचं तेल घाला.
आता तयार मिश्रण केसांना हेअर मास्कप्रमाणे लावा
30 मिनिटांनंतर केस धुवून टाका.

जर लसणााच तेल नसेल तर असा करा लसणाचा वापर

3) लसणाच्या पाकळ्या आणि खोबरेल तेल

जर तुमच्याकडे लसणाचं तेल नसेल तर लसणाच्या पाकळ्या वाटून घ्या.
यात कोमट खोबऱ्याचं तेल एकत्र करा.
हे मिश्रण केसांना लावा.
30 मिनिटांनंतर केस शॅम्पूनं धुवून टाका.
हा उपाय केसांसाठी खूप लाभदायक आहे.
यामुळं केसांना सल्फर, केराटीन मिळतं. केस मजबूत होतात.