ग्लोईंग त्वचेसाठी करा फ्रुट फ्रेशियल, ‘या’ 4 प्रकारच्या त्वचेनुसार निवडा ही फळे, घरच्याघरी असे करा फेशियल

पार्लरमध्ये जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी फ्रुट फ्रेशियल केल्यास त्वचेवर ग्लो येऊ शकतो. तुम्ही घरच्याघरी ब्लिच आणि फेशियल करून त्वचा उजळदार बनवू शकता. कमीतकमी सामानात घरच्याघरी कशाप्रकारे फेशियल करता येते, ते जाणून घेवूयात…

फ्रुट फ्रेशियल
फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायद्याचे आहे. फ्रूट फेशियलमध्ये क्रीमऐवजी ताज्या फळांनी मसाज करता येऊ शकतो. ताज्या फळांनी मसाज करताना त्वचेला लागू होत असेल असेच फळ निवडावे.

असे निवडा फळ

1 त्वचा कोरडी असेल त्यांनी केळं
2 तेलकट त्वचा असल्यास संत्र
3 अगदीच कोरडी त्वचा असलेल्यांनी स्ट्रॉबेरी
4 पिगमेंटेशन असणार्‍या त्वचेसाठी पपई वापरावी

असे करा फ्रूट फेशियल

1 फेशियल करताना पहिले तुमचे केस बांधून घ्या. यासाठी हेअरबँडदेखील वापरा.
2 चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्झिंग करावे. घरी क्लिंजर बनविण्यासाठी एका वाटीत 2 चमचे दही आणि 1 चमचा मध घ्या. हा लेप लावून कमीत कमी 5 मिनिट ठेवावे. त्यानंतर चेहरा साफ करून घ्या.

3 त्यानंतर स्क्रब करा. घरी स्क्रबर बनविण्यासाठी एक केळं मिक्सरमध्ये 1 चमचा दूध, दोन चमचे ओट्स आणि एक चमचा मधाबरोबर वाटून घ्यावे. आता हे चेहर्‍यावर 10 मिनिटार्यंत हळूहळू स्क्रब करा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडली जातात. त्यानंतर मॉईस्चराईजर त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते.

4 स्क्रबिंगनंतर वाफ घ्या. स्टिमर नसल्यास गरम पाणी एका पातेल्यात गरम करून वाफ घ्या. नंतर स्वच्छ टॉवेलनं चेहरा पुसून घ्या. त्यानंतर मसाज क्रिम लावून योग्य दिशेनं त्वचेची मसाज करा. नंतर फेसपॅक लावावा.

5 केळी आणि पुदीन्याची पाने चांगल्याप्रकारे एकत्र करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक 15 ते 20 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहर्‍यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं. पिंपल्समुळे चेहर्‍यावर डाग असतील तर लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक त्या डागांना कमी करण्याचं काम करतो.

असा तयार करा फेसपॅक
लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी 10 ते 12 पुदीन्याची पाने घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. पाने चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहर्‍यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक आठवड्यातून 2 वेळा लावू शकता.