Beed : ट्रकच्या धडकेत रिक्षातील 4 मित्रांचा मृत्यु, लग्नावरुन परताना झाला अपघात

बीड : मित्राच्या लग्न समारंभावरुन गावी परत येत असताना राखेची वाहतूक करणार्‍या ट्रकने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत चार मित्रांचा मृत्यु झाला. हा अपघात बीड जिल्ह्यातील गंगाखेड परळी महामार्गावर घडला.

दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले आणि रिक्षाचालक मुकुंद म्हस्के यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हे चौघेही अंबाजोगाई येथील रायगडनगर येथे राहत होते. ते सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथे मित्राच्या लग्नासाठी गेले होते. लग्नसमारंभ ओटपून ते चौघेही अंबाजोगाईकडे परत येत होते.

परळी महामार्गावरी करम गावाजवळ राखेची वाहतूक करणार्‍या ट्रकने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षा गाडीखाली अडकली होती. २ तासांच्या प्रयत्नांनंतर रिक्षा ट्रकखालून काढण्यात यश आले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यु झाला.