Beed Accident News | बीड-परळी मार्गावर 2 जीपची समोरासमोर धडक; दीर-भावजय जागीच ठार

ADV

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Accident News | बीड-परळी मार्गावरील (beed parli highway) जरूड फाट्यावर आजारी असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक (Beed Accident News) दिली. या अपघातात दीर- भावजय जागीच ठार झाले तर सुदैवाने दोन वर्षांच्या बाळासह त्याचे वडील वाचले. हा अपघात मंगळवारी पहाटे घडला.

रवि नागोराव मिटकर (२६), सोनाली माधव मिटकर (३०) अशी मृत दीर- भावजयीची नावे आहेत. तर गौरव माधव मिटकर (२) आणि माधव नागोराव मिटकर (३५) हे अपघातातून वाचले. त्याचबरोबर चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिटकर कुटुंब हे घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी आहेत. गौरवला रात्री ताप आला होता ताप काही कमी येत नसल्याने मिटकर कुटुंबीय गौरवला घेऊन पहाटे ३ वाजता बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस – ०४६७) निघाले होते. तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती. बीड- परळी मार्गावरील जरूड फाट्यानजीक मालवाहू जीप चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या जीपला जोराची टक्कर दिली. हि टक्कर इतकी जोरात होती कि शंभर दीडशे मीटर वर जाऊन जीप उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच ठार झाले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव अपघातानंतर जीपमधूल बाहेर पडल्याने वाचले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, दोन जीपची समोरसमोर धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला.
हा आवाज एकूण किशोर काकडे व जालिंदर काकडे यांनी घटनस्थळी धाव घेतली.
दादासाहेब लांडे हे देखील तेथे पोहोचले.
सर्वांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
तर मालवाहू जीप चलक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला स्थानिकांनी पकडून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे देखील वाचा

RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !

Chandrapur News | फिल्मी लव्ह स्टोरी ! तरुणीनं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं, अन्…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Beed Accident News | two jeeps collided head killing two on beed parli highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update