Chandrapur News | फिल्मी लव्ह स्टोरी ! तरुणीनं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं, अन्…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Chandrapur News | एखाद्या फिल्ममध्ये जसं प्रेमप्रकरणाची स्टोरी (Love story) घडत असते. तशीच एक स्टोरी हकिकतात चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील बोथली गावात घडली आहे. एका युवतीने विवाह (Marriage) झाल्यानंतर तीन महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं आहे. त्यांनंतर युवतीच्या कुटुंबीयांनी प्रेमाला स्वीकारुन अखेर आपल्या मुलीचा विवाह प्रियकराशी (The girl’s marriage to a lover) लावून दिलं. हा प्रेमीयुगुलांचा आंतरजातीय विवाह सोहळा रविवारी दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं पार पाडला. हा विवाह हनुमान मंदिरात घेण्यात आला त्यावेळी लोकांनी लग्नाला हजेरी लावली.

याबाबत अधिक माहिती अशी, महेश श्रीराम नागपुरे (Mahesh Shriram Nagpure) आणि शिवानी दिनकर सुकारे (Shivani Dinkar Sukare) अशी विवाह झालेल्या प्रेमीयुगालांची नावे आहेत.
गेल्या 2 वर्षापासुन महेश आणि शिवानी एकमेकांशी प्रेम करत होते. पण दोघंही वेगवेगळ्या जातीचे असल्यानं दोघांचं लग्न जमलं नाही.
शिवानीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रेमाला विरोध केला अन् दुस-या तरुणाशी लग्न लावुन दिलं होतं.
मात्र, शिवानीने विवाहाच्या 3 महिन्यांनंतरच कठोर निर्णय घेतला.
लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी शिवानीनं आपल्या नवऱ्याचं घर सोडून थेट प्रियकर महेशच्या घरी आली आहे.

महेशच्या घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार महेशच्या घरच्यांना सांगितला.
तसेच आता मी या घरातून परत जाणार नाही, माझं जे काही व्हायचं आहे, ते याच घरात होईल, अशी थेट भूमिका शिवानीनं घेतली होती. यांनतर याबाबत माहिती शिवानीच्या घरच्यांनाही देण्यात आली.
दोन्ही कुटुंबीयांनी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला.
पण शिवानीनं कोणाचंही ऐकलं नाही. शेवटी प्रेमापुढे दोन्ही कुंटुंब झुकले.
आणि दोघांची विवाहाच्या बंधनाची गाठ बांधून दिली.

 

Web Title : Chandrapur News | after 3 months of marriage woman get married 2nd time with boyfriend in chandrapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !

Tahsildar Jyoti Deore Transfer | अखेर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

Ranveer Singh and Deepika Padukone | रणवीर, दीपिका होणार अलिबागकर; ‘या’ कामासाठी मोजले तब्बल 22 कोटी रूपये