RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI | भारताची सर्वात मोठी असणारी बॅंक म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) आता सगळ्या बॅँक ग्राहकांसाठी एक सुचना जारी केली आहे. कोरोना काळात वाढत गेलेले फसवणुकीचे (fraud) प्रकार आणि सध्याही फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. डिजिटल पेमेंट वाढल्याने फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अटकाव घालण्यासाठी आणि ग्राहकांचा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आरबीआय बॅँकेनं सावधानतेच्या सुचना दिल्या आहेत. (Important tips for all consumers given by RBI to be vigilant against fraud)

केवायसी (Know Your Customer-KYC)अपडेट करण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांची फसवणूक (fraud) केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फसवणूक करणारे यासाठी नवीन पद्धती अवलंबत आहेत. तुम्ही तुमचे कार्ड अत्यंत काळजीपूर्वक वापरा. ATM/Debit card माहिती कोणाशी देखील शेअर करू नका, अशा सुचना RBI ने ट्वीटच्या माध्यमातुन सांगितल्या आहे.

ग्राहकांना कॉल, SMS आणि Email पाठवून वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले जात आहे.
यात लॉगिन, कार्ड, पिन (PIN) आणि ओटीपी (OTP) याबाबत माहिती मागितली जाते.
बँक ग्राहकांना लिंक पाठवून केवायसी अपडेट (KYC update) करण्यासाठी unauthorised किंवा unverified अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकते.
असं आरबीआयचं म्हणनं आहे. दरम्यान, जर त्यांनी केवायसी अपडेट केले नाही तर त्यांचे अकाउंट ब्लॉक किंवा बंद केले जाऊ शकते.
अशा परिस्थितीत जर ग्राहकाने कॉल, मेसेज किंवा बेकायदेशीर अ‍ॅपवर त्याची माहिती शेअर केली तर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळेल आणि ते ग्राहकाची फसवणूक करू शकतील.
असं RBI म्हटलं आहे.

दरम्यान, नियमन केलेल्या संस्थांना वेळोवेळी केवायसी अपडेट (KYC update) करावे लागते,
परंतु ही प्रक्रिया सोपी केली गेली आहे.
जर एखाद्या ग्राहकाच्या अकाउंटचे नियतकालिक अद्ययावत करायचे असेल तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये फक्त या कारणामुळे कोणतीही कारवाई केली जाणार नाही की,
कोणत्याही नियामक/अंमलबजावणी एजन्सी/ कोर्टाच्या निर्देशानुसार असं करणे आवश्यक नाही.
याबाबत आरबीआयने सविस्तर सुचना (Information) दिले आहे.

Web Titel :- RBI | rbi issued important notice all bank customers check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो’ (व्हिडीओ)

Ranveer Singh and Deepika Padukone | रणवीर, दीपिका होणार अलिबागकर; ‘या’ कामासाठी मोजले तब्बल 22 कोटी रूपये

Pravin Darekar | NCP वर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’ (व्हिडीओ)