Beed Crime News | दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | राज्यात लहान मुलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीडमध्ये दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या बाबतीत अशीच एक घटना घडली आहे. पीडित तरुणी दहावीची परीक्षा देऊन घरी जात असताना आरोपीने विद्यार्थीनीचा हात पकडून ‘चल माझ्यासोबत, तुझ्या आई-वडिलांना लग्न करून द्या म्हणू’ असे म्हणत विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) केला आहे. तसेच तिच्या आईला शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Beed Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
पीडित तरुणी व आरोपी एकाच गल्लीत राहत असून एकाच ठिकाणी शिक्षण घेतात. सध्या 10 वीच्या बोर्डाचे पेपर सुरु आहेत. २ मार्च रोजी सकाळी 10 वाजता पीडित तरुणी बोर्डाचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी आरोपी तरुणाने तिचा पाठलाग केला. यानंतर पीडित तरुणी जेव्हा दुपारी 2 वाजता पेपर संपल्यानंतर केंद्रातून बाहेर आली तेव्हा आरोपी तरुण त्या ठिकाणी तीची वाट पाहत होता. (Beed Crime News)

यानंतर हि तरुणी त्या ठिकाणी आल्यावर आरोपीने तिचा हात पकडला. ‘चल माझ्यासोबत. आपण तुझ्या घरी जावू आणि तुझ्या आई-वडिलांना लग्न करून द्या, असे म्हणू’ असे म्हणत तिच्याशी हुज्जत घालू लागला. यानंतर पीडितेने झटका मारून त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला. यादरम्यान पीडितेची आई त्याठिकाणी आली व तिने आरोपीला याचा जाब विचारला तेव्हा आरोपीने पीडित तरुणीच्या आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित तरुणीने आई-वडिलांसह बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

Web Title :-  Beed Crime News | girl molested while going home after 10th exam incident in beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’

Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

NAAC | राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन अनिवार्य; अन्यथा प्रवेशप्रक्रिया होणार रद्द