
Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’
हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आठ महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay alias Bandu Jadhav) यांनी देखील खंत व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर (Maharashtra Politics) उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विविध माध्यमातून माहाराष्ट्रात दौरे सुरु केला. सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रा सुरु आहे. याद्वारे शिवसेनेचे नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवगर्जना सभेत बोलताना खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे चुकले असे स्पष्टपणे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खासदार बंडू जाधव म्हणाले, अडीच वर्षाचा काळ असाच गेला. त्यावेळी आम्हाला सत्तेचा लाभ करुन घेता आला नाही. याच्यासारख दुसरं दु:ख असू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. ते देऊ शकले नाही किंवा स्वत:ही लक्ष दिले नाही म्हणून हा प्रसंग ओढावला, हे सत्य आहे, असे जाधव म्हणाले.
बंडू जाधव पुढे म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होतं,
आणि आदित्य ठाकरेंना मंत्री करायचं होतं तर स्वत: मुख्यमंत्री व्हायला नको होतं.
दोघंही मंत्री झाल्याने पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही आणि गद्दारांना संधी मिळाली.
तुम्ही खुर्ची आटवल्याने त्यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल.
त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं. आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असे बंडू जाधव म्हणाले.
Web Title :- Maharashtra Politics | bandu jadhav on eknath shinde left shivsena and uddhav thackeray cm aaditya thackeray minister
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | चोरीला गेलेले दागिने महिलेला केले परत, कोंढवा पोलिसांची कामगिरी