Beed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्‍यानं केलं ‘हे’ कृत्य

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime News | पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. 37 वर्षीय नवर्‍याने आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांना उल्हास पवार यांच्या खिशात सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. (Beed Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या 37 वर्षीय नवर्‍यास पत्नीचे घराशेजारीच राहणाऱ्या एका तरुणाबरोबर अनैतिकसंबंध असल्याचे समजले होते. त्यांनी समज देऊनही पत्नीनं शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. या प्रकाराला ते वैतागले होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी (Beed Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं असून पत्नीचं घराशेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर अनैतिक संबंध सुरू असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Web Title : Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये