माजी मंत्री असलेल्या काकांना पुतण्या वरचढ ; बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी विजयी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांनी अपक्ष उमेदवार शेख समीरा बेगम खमर यांना पराभूत केलं.

बीड शहर प्रभाग क्र.११ अ मधील पोटनिवडणुकीत एका जागेसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यातील संदीप क्षीरसागर यांच्या गटाविरोधात जयदत्त क्षीरसागर यांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होती. संदीप क्षीरसागर यांच्याकडून मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन या उमेदवार होत्या तर जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष समीरा बेगम खमर निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. मोमीन यांना १०३९ मतं मिळाली तर शेख समीरा यांना ७५४ मतं मिळाली.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर ही काका पुतण्याची जोडी आहे. छोट्या जागेसाठी निवडणूक होती, परंतू राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीची सगळी जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली होती. म्हणूनच जयदत्त क्षीरसागर यांना अपक्ष उमेदवार उभा केला होता. त्यावर पुतण्याने काकाला नमवत विजय मिळवला आहे. जयदत्त क्षीरसागर हे आघाडी सरकारच्या काळात मंत्री हाेते.

राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश
भाजपाचा ‘हा’ आमदार आजही राहतोय झोपडीत