Belaum Loksabha by Election Result : बेळगावमध्ये भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर

बेळगाव : वृत्तसंस्था – खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे मतदान झाले आहे. आज निकाल जाहीर होत आहेत. आज सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपकडून मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात 10 उमेदवार असले तरी भाजपच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यात लढत आहे. या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान झाले होते 18 लाख 13 हजार 567 पैकी 10 लाख 8 हजार 601 मतदारांनी मदतानाचा हक्क बजावला आहे.

बेळगाव लोकसभा निवडणुकीत 27 व्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी जवळपास 13 हजार मतांची आघाडी घेतली आहे. या फेरीअखेर भाजपला 1 लाख 51 हजार 472, काँग्रेसला 1 लाख 38 हजार 194, महाराष्ट्र एकीकरण समितीला 39 हजार 992 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांची झेप कुठपर्यंत याचीही उत्सुकता लागली आहे.

मंगला अंगडींना मोठा लीड

मंगला अंगडी – 151472
सतीश जारकीहोळी – 138194
शुभम शेळके – 39992