Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स

नवी दिल्ली : Belly Fat Loss | सध्या चुकीचा आहार (Diet) आणि जीवनशैली (Lifestyle) मुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. वजन वाढवणे सोपे आहे, परंतु वाढलेले वजन कमी करणे खूप कठीण आहे. यासाठी काही ड्रिंक्सबाबत जाणून घेऊया, ज्यांच्या सेवनाने पोटाची चरबी लवकर कमी होते (Coconut Water For Belly Fat Loss).

नारळपाणी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात नारळ पाण्याचा (coconut water) समावेश करा. यातील पोषक घटक (neutrinos) वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात.

नारळ पाण्याने असे कमी होते वजन

नारळ पाण्यातील पोषकतत्व पोटावरील चरबी कमी करतात. त्यात नॅचरल शुगर (sugar) आणि कॅलरीज (calories) नगण्य प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी होते. नारळपाणी प्यायल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात नारळपाण्याचा समावेश करा.

सकाळी प्या नारळपाणी

नारळपाणी कधीही पिऊ शकता. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी (weight loss) ते सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पोटाची चरबी जलद वितळते.

ओव्याचे पाणी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात ओव्याच्या पाण्याचा समावेश करा.
यासाठी ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उकळून रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

जिरे पाणी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात जिऱ्याच्या पाण्याचा समावेश करा.
यासाठी १ कप पाण्यात जिरे रात्रभर भिजत ठेवा. यानंतर,

सकाळी इतके उकळवा की ते अर्धा कप होईल. आता हे ड्रिंक रिकाम्या पोटी प्या.
त्यामुळे आठवडाभरात फरक पडेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Fall Problem | केस गळतीच्या समस्येने घाबरून जाऊ नका, आजच ‘या’ वस्तू डाएटमधून काढा बाहेर