हिवाळ्यात खुप कामाची आहे ‘ही’ गोष्ट, इम्यूनिटी वाढेल आणि लठ्ठपणा होईल कमी

पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात निरोगी राहण्याचे खुप मोठे आव्हान असते. कारण या काळात विविध आजार मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता असते. इम्युनिटी कमी झाल्याने हा धोका असतो. यासाठी हिवाळ्यात सूप आणि गरम पदार्थांचे सेवन करावे. अशीच एक वस्तू आहे कांजी. जिचे सेवन केल्याने हिवाळ्यात खुप फायदा होऊ शकतो. याबाबत जाणून घेवूयात…

कांजी एक फर्मन्टेड ड्रिंक आहे जे गाजर आणि बीटपासून बनवले जाते. याचे सेवन केल्याने इम्यूनिटी वाढते. तसेच वजन सुद्धा नियंत्रित ठेवते.

हे आहेत फायदे
1 शरीराची इम्यूनिटी मजबूत होते.
2 वजन नियंत्रित राहते.
3 हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
4 कोलेस्ट्रॉल लेव्हलनियंत्रित राहते.
5 हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
6 अनेक आजार दूर होतात.
7 बल्ड शुगरची लेव्हल नियंत्रित राहते.
8 बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

अशी तयार करा कांजी

पाच-सात गाजर सोलून घ्या. बारीक बरीक तुकडे करून घ्या. नंतर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाच चमचे मोहरी पावडर आणि काळे मीठ चवीनुसार घ्या आणि सोबत दहा कप उकळलेले पाणी, या गोष्टी कांजी बनवण्यासाठी आवश्यक आहेत.

यानंतर सर्व वस्तू एका काचेच्या भांड्यात मिसळा. नंतर झाकण लावून भांडे सुमारे पाच दिवस उन्हात ठेवा आणि रोज तपासून पहा. जेव्हा कांजीची चव आंबट होईल, तेव्हा समजा की, गाजर-बीटची कांजी तयार झाली आहे. यानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.