Benefits Of Eating Banana With Milk | पुरुषांसाठी लाभदायक २ वस्तूंचे कॉम्बिनेशन, रात्री झोपायला जाण्यापूर्वी करा सेवन, ४ समस्या होतील दूर

नवी दिल्ली : Benefits Of Eating Banana With Milk | आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दूध आणि केळी दोन्ही लाभदायक आहे. या दोन्ही गोष्टी पोषक तत्वांचा चांगला स्रोत मानल्या जातात. केळीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन आणि फॉलिक अ‍ॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक असतात (Benefits Of Eating Banana With Milk).

व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक दुधामध्ये असतात. यासाठी बहुतांश लोक सकाळी दूध आणि केळी वेगवेगळे खातात. परंतु रात्रीच्या वेळी दूध आणि केळी एकत्र खाऊ शकता. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कन्नौजचे कम्युनिटी मेडिसिन हेड प्रोफेसर डॉ. डी. एस. मारटोलिया यांनी रात्री दूध आणि केळी एकत्र खाण्याचे फायदे एका वृत्तवाहिनीला सांगितले आहेत ते जाणून घेऊया (Benefits Of Eating Banana With Milk)-

दूध आणि केळी एकत्र खाण्याचे ४ चमत्कारिक फायदे

वजन वाढवा :

रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो. वजन लवकर वाढते. यासाठी एक ग्लास दुधात केळी, मध आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. यानंतर ते प्या.

विकनेस दूर करा :

पुरूषांनी सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि केळीचे सेवन करावे. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. तसेच पुरुषांच्या शारीरिक दुर्बलतेवर मात करता येते.

पचनक्रिया निरोगी ठेवा :

रात्री दूध आणि केळीचे मिश्रण सेवन केल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.
यातील व्हिटॅमिन आणि फायबरमुळे पचन सुधारण्यास मदत करते.
गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

निद्रानाश टाळा :

रात्री नीट झोप येत नसेल तर दूध आणि केळीचे सेवन लाभदायक ठरते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
निद्रानाशाची समस्या दूर होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kiara Advani | मुंबई एयरपोर्टवर अभिनेत्री कियारा आडवाणी झाली देसी लूकमध्ये स्पॉट; व्हिडिओ व्हायरल