Kiara Advani | मुंबई एयरपोर्टवर अभिनेत्री कियारा आडवाणी झाली देसी लूकमध्ये स्पॉट; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) ही नेहमी आपल्या फॅशनने सर्वांना अवाक करते. कियारा ही सध्या बॉलीवुडच्या महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक बनली असून तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी ही तिच्या चित्रपटांतील अभिनयाबरोबर तिच्या कूल फॅशनमुळे देखील नावाजली जाते. नुकतीच कियारा (Kiara Advani) मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिने केलेल्या देसी लूकमुळे (Kiara Advani Desi Look) सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कियारा आडवाणी हिची चर्चा सुरु आहे.

बॉलीवुड अभिनेत्रींचा एयरपोर्ट लूक (Bollywood Actress Airport Look) हा नेहमी चर्चेचा विषय बनलेला असतो. कम्फटेबल तसेच स्टाईलिश लूकसाठी सर्व तरुणी अभिनेत्रींची एयरपोर्ट फॅशन फॉलो करत असतात. यामध्ये आता अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्या लूकची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी ही नुकतीच मुंबई एयरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाली. यावेळी तिने यलो कलरची सुंदर वर्क असलेला कुर्ता सेट स्टाईल केला होता. तिच्या या डिझायनर कुर्त्याची तरुणींना भूरळ पडली असून अनेकांना तिचा हा अंदाज आवडला आहे. काही दिवसांपूर्वी ती वाघा बॉर्डरवर (Wagah Border) देखील सुंदर अशा ट्रेडिशनल लूक मध्ये झळकली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणी हिची एयरपोर्टवरील ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडिओवर व स्टाईलिंगवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. बॉलीवुड अभिनेत्री आता अनेकदा देसी लूक कॅरी करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील अनारकली ड्रेसमध्ये एयरपोर्टवर स्पॉट झाली होती. तसेच सारा अली खान (Sara Ali Khan) देखील अनेकदा कुर्ती मध्ये दिसून येते.

https://www.instagram.com/p/Ct_qF24o0EW/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CtviFiHIMkb/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CtyI_n6oGCl/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CtT9xNAP6cq/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CqxHDySombT/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | डान्सर नोरा फतेहीच्या कलरफुल बॉडीकॉन वन पीस ड्रेसने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून तरुणाचा खून; प्रचंड खळबळ