Best Exercise For Heart Attack | हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी कोणती एक्सरसाइज जास्त लाभदायक, हार्वर्डने दिली ‘ही’ टिप्स

नवी दिल्ली : Best Exercise For Heart Attack | आधुनिक धावपळीच्या जीवनात, लोकांकडे वेळेची तीव्र कमतरता आहे. त्यांची जीवनशैली गतिहीन झाली आहे. तसेच अनहेल्दी फूडने जीवनशैलीशी संबंधित आजार वाढवले आहेत. लठ्ठपणा, टाईप २ डायबिटीज आणि हृदयाचे आजार सर्वात जास्त होत आहेत. यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे (Best Exercise For Heart Attack). हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असा दावा केला आहे की, नियमित पुश अप केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये प्रामुख्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा समावेश आहे (Pushups prevent heart attack).

स्टडीत समोर आली ही बाब

जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात पुश अप्सच्या फायद्यांचे विश्लेषण केले आहे. यामध्ये पुश करण्याचा वेळ आणि वारंवारतेकडे लक्ष देण्यात आले. अग्निशमन दलातील लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. (Best Exercise For Heart Attack)

स्टडीत असे आढळून आले की ज्या व्यक्तीने ३० सेकंदाच्या आत ४० पुश अप्स काढले, त्यांच्यात हार्ट अटॅक, हार्ट फेल्यूअर आणि इतर प्रकारच्या कार्डिओव्हॅस्क्यूलर गुंतागुंतीची जोखीम पुढील १० वर्षांपर्यंत नगण्य होती. ज्या व्यक्तीने ३० सेकंदाच्या आत १० पेक्षा कमी वेळा पुश अप्स काढू शकले त्यांच्यात पुढे हार्ट अटॅकची जोखीम दिसून आली.

डॉ. विशाल रस्तोगी यांनी सांगितले की, पुश अप्स हा हृदयासाठी नक्कीच एक उत्तम व्यायाम आहे,
परंतु जर वय ४० वर्षे असेल तर शरीरावरील क्षमतांचे मूल्यांकन केले पाहिजे. म्हणजेच, हृदय पुश अप्सचा दबाव सहन
करू शकते की नाही हे तपासणे आवश्यक आहे. यासाठी टीएमटी चाचणी घेणे आवश्यक आहे.

जर एखादी व्यक्ती ४० वर्षांची असेल तर व्यायामाच्या वेळी त्याच्या हृदयाचे ठोके १८० पेक्षा जास्त नसावेत.
जास्त असल्यास अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. यासाठी डॉक्टरांकडून चाचणी करणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ