Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीमध्ये बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही पुंगळी (Pune Crime News) शनिवारी (दि.28) के. जे. कॉलेज, बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ आढळून आली आहे. पोलिसांकडून पुंगळी जप्त करण्यात आली असून परिसरात याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

के. जे. कॉलेज (K. J. College), बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या निपाणी नावाच्या व्यक्तीला बुलेट (Bullet सदृश्य वस्तू आढळून आली. याबाबत कोंढवा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आणि ए.टी.एस च्या (ATS) पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बुलेट ताब्यात घेतली असून अद्याप ही बुलेट खरी आहे की नाही हे समजू शकले नाही. पोलिसांकडून ही बुलेट पुंगळी एअर गन मधील आहे का याचा तपास केला जात आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonawane) यांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत कॉलेजचे मॅनेजमेंट अधिकारी सोमनाथ ढगे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितली, या ठिकाणी कोणताही भांडणाचा प्रकार घडलेला नाही. पोलिसांकडून कॉलेज व हॉस्टेल परिसरात अधिक तपास केला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

How To Get Rid Of Stomach Heat | पोटातील उष्णतेमुळे शरीराला त्रास होतोय,
अवलंबा ४ सोप्या टिप्स, नॅचरली उदर होईल ‘ठंडा-ठंडा कुल-कुल’