यकृत ‘स्वच्छ’ अन् ‘हेल्दी’ ठेवायचं असल्यास आहारात समाविष्ट करा ‘या’ 6 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – निरोगी होण्यासाठी यकृत निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. यकृत शरीरातून विषारी पदार्थ तसेच रक्तातील घाण काढून टाकण्यासाठी एंझाइम सक्रिय करते. यकृत घाण काढून टाकण्यासाठी एंझाइम सक्रिय करते. निरोगी होण्यासाठी यकृत निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. काही नैसर्गिक निरोगी पदार्थ घेत यकृत निरोगी ठेवू शकता.

यकृत शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण आणि अन्न पचन करण्यासाठी कार्य करते. परंतु, काही सवयींमुळे यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही. तळलेले अन्न खाणे, व्यायाम न करणे, जास्त प्रमाणात धूम्रपान करणे यांसारख्या वाईट व्यसनांचा समावेश आहे. यकृतावरील उच्च दाबांमुळे ते शरीरातून विषाक्त पदार्थ योग्यप्रकारे काढू शकत नाही. ज्यामुळे शरीरावर अनेक समस्या येऊ शकतात. तर मग आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगू जे तुमचे यकृत निरोगी ठेवतात.

ग्रीन टी
ग्रीन टी यकृतासाठी खूप चांगली मानली जाते. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. जे यकृत डिटोक्समध्ये मदत करू शकते. दिवसभरात २-२ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बीट
बीटमध्ये वनस्पती-फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीन असतात. बीटरूटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बीटरूट यकृत आणि रक्त दोन्ही स्वच्छ करण्यात मदत करू शकते.

गाजर
गाजर हे ग्लूटाथिओन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असत. जे आरोग्य आणि यकृत निरोगी ठेवते.